फेरारीची फेरारी अमाल्फी भारतात सादर; किंमत ₹5.59 कोटी

By: Editor_Manas

On: Sunday, February 22, 2026 2:17 PM

Google News
Follow Us

इटलीची प्रसिद्ध सुपरकार निर्माता फेरारीने फेब्रुवारी रोजी भारतात आपले नवीन एंट्री-लेव्हल मॉडेल फेरारी अमाल्फी सादर केले. फ्रंट-इंजिन आणि 2+2 सीटिंग लेआउट असलेली ही सुपरकार वेगासोबत लक्झरी व दैनंदिन वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. अधिकृत लॉन्चिंग वर्षाच्या मध्यात अपेक्षित असून, कंपनीने चौकशी व बुकिंग प्रक्रिया सुरू केली आहे.

भारतात अमाल्फीची एक्स-शोरूम किंमत ₹5.59 कोटी ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये सादर झालेल्या फेरारी रोमाची किंमत ₹3.76 कोटी होती. नव्या मॉडेलच्या डिलिव्हरीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागू शकते आणि भारतात प्रत्यक्ष डिलिव्हरी 2027 पूर्वी सुरू होण्याची शक्यता कमी मानली जाते.

 

दमदार इंजिन आणि परफॉर्मन्स

फेरारी अमाल्फीमध्ये 640hp क्षमतेचे शक्तिशाली V8 इंजिन देण्यात आले आहे. ही सुपरकार केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते.

स्पर्धा

भारतीय बाजारात या कारचा थेट मुकाबला अ‍ॅस्टन मार्टिन व्हँटेजसारख्या लक्झरी स्पोर्ट्स कारशी होणार आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026