२१ फेब्रुवारी २०२६, पुणे: पुण्यातील पहिले ४०० बेड्सची क्षमता असलेले ‘क्वाटरनरी केअर सेंटर’ असलेल्या अपोलो हॉस्पिटल्स पुणेतर्फे जागतिक कॅन्सर महिन्यानिमित्त ‘झिरो टू हिरो’ या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. कॅन्सरचे अगदी पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. कॅन्सरचे लवकरात लवकर निदान झाल्यास त्यावर मात करणे शक्य आहे, या अपोलोच्या विश्वासावर ही मोहीम आधारित आहे. कॅन्सर तपासणी (स्क्रीनिंग), प्रतिबंधासाठी उपाययोजना आणि वेळेत उपचार यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमात नामवंत तज्ञ डॉक्टर, कॅन्सरवर मात केलेले नागरिक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत.
अपोलो हॉस्पिटल्स पुणे येथील ‘ऑन्कोलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध शाखांचे तज्ञ उपलब्ध आहेत, त्यांच्या समन्वयाने याठिकाणी कॅन्सरवर सर्वसमावेशक उपचार केले जातात. हे केंद्र अचूक आणि लवकर निदानासाठी एआय-सक्षम PET-CT, अचूक रेडिएशन थेरपीसाठी VARIAN EDGE LINAC, आणि मूत्रपिंड, स्त्रीरोग, जठरांत्र (Gastrointestinal), तसेच मान व डोक्याच्या कॅन्सरवरील जटिल शस्त्रक्रियांसाठी Da Vinci Xi रोबोटिक प्रणाली यांसारख्या आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. प्रगत निदान चाचण्या, अचूक रेडिएशन आणि रोबोटिक शस्त्रक्रियेच्या जोरावर हे केंद्र कॅन्सरचे लवकर निदान, अचूक उपचार आणि जलद रिकव्हरी यासाठी आवश्यक त्या सर्व घटकांचा समन्वय साधून तयार केलेला दृष्टिकोन अवलंबते. तंत्रज्ञान-आधारित आणि रुग्ण-केंद्रित सेवेद्वारे कॅन्सरवरील उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सची वचनबद्धता यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते.
या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलताना अपोलो हॉस्पिटल्स पुणेच्या सीईओ डॉ. मनीषा करमरकर म्हणाल्या, “कॅन्सरविरुद्धच्या लढाईत त्याचे लवकरात लवकर निदान होणे आणि त्याला प्रतिबंध घातला जाणे ही सर्वात प्रभावी शस्त्रे आहेत. वेळेत केलेला उपचार रुग्णाचे प्राण वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि ‘कॅन्सरवर मात करता येते’ या अपोलोच्या अनेक वर्षांच्या विश्वासाला बळकटी देतात. मात्र, तपासणी तेव्हाच यशस्वी होते जेव्हा लोक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. अनेकदा भीती, सामाजिक कलंक, चुकीची माहिती आणि जागरूकतेचा अभाव यामुळे निदानालाच उशीर होतो. अपोलो हॉस्पिटल्स पुणेचा ‘प्रोहेल्थ’ (ProHealth) हा भारतातील पहिला एआय-सक्षम प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम असून, तो प्रगत तपासणी आणि जोखीम मूल्यमापनाद्वारे व्यक्तींना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहण्यास व नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतो.”
सिनियर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, रोबोटिक आणि HIPEC स्पेशालिस्ट डॉ. स्निता सिनुकुमार म्हणाल्या, “जवळपास ४० ते ५०% कॅन्सर हे केवळ प्रतिबंधात्मक उपाय, योग्य जीवनशैली आणि नियमित तपासणीद्वारे रोखले जाऊ शकतात किंवा त्यांचे लवकरात लवकर निदान होऊ शकते. डिजिटल मॅमोग्राफी, पॅप स्मीअर, लो-डोस सीटी स्कॅन, कोलोनोस्कोपी, पीएसए (PSA) चाचणी आणि मौखिक (oral) तपासणी यांसारख्या चाचण्यांमुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच कॅन्सरचा शोध घेता येतो. जर निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले, तर रुग्णाचे प्राण वाचण्याचे प्रमाण ८० ते ९०% किंवा त्याहूनही अधिक








