“धावण्यातून प्रकाशमय होणार; आदिवासी मुलांच्या शिक्षणाची पायावट”

By: Editor_Manas

On: Thursday, January 1, 2026 3:41 PM

Google News
Follow Us

पुणे : शिक्षण आणि समाजकार्याच्या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेला एकल धावमहोत्सव – पुणे (तिसरे पर्व) येत्या रविवारी, ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सहा वा. महाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या धावमहोत्सवाचे आयोजन फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे दुर्गम ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी निधी संकलन करणे होय. विशेष बाब म्हणजे या धावमहोत्सवात एकल फाउंडेशन अंतर्गत शिक्षण घेणारी तब्बल ३०० मुले स्वतः धावणार असून, त्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रेरणादायी ठरणार आहे. देशभर एकूण ४५ हजार विद्यार्थी या संस्थेच्या मार्फत शिक्षण घेत असून भारतभर यांचे एकूण ३७ विभाग आहेत.

या धावमहोत्सवात २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर स्पर्धात्मक धाव, तसेच ३ किलोमीटर आनंदी धाव अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. याशिवाय कार्पोरेट गटांसाठी स्वतंत्र धाव आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धात्मक धावांसाठी वेळ मोजणी यंत्रणा उपलब्ध असून, प्रत्येक गटातील उत्कृष्ट धावपटूंना सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.

ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेली ‘फ्रेंड्स ऑफ ट्रायबल्स सोसायटी’ अर्थात एकल फाउंडेशन गेली ३७ वर्षे समाजसेवेचे भरीव कार्य करत आहे. देशभरातील ३७ शाखांद्वारे सुमारे ४५ हजार एकल विद्यालयांच्या माध्यमातून तब्बल १२ लाख आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्ये पोहोचवली जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026