BJP PUNE : भाजप पॅनलच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ
पुणे | प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजप) पॅनलच्या प्रचाराचा उत्साहपूर्ण शुभारंभ बिबवेवाडी येथील शंकर महाराज मठ येथे जल्लोषात झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी प्रभाग क्रमांक 20 मधील भाजप पॅनलचे उमेदवार राजेंद्र आबा शिळीमकर, तन्वीताई प्रशांत दिवेकर, मानसीताई मनोज देशपांडे आणि महेंद्र माणिकचंद सुंदेचा एकत्र उपस्थित होते. प्रचाराच्या प्रारंभी सर्व उमेदवारांनी मठात दर्शन घेऊन प्रचाराची विधिवत सुरुवात केली.
कार्यक्रमात उमेदवारांनी मागील कालावधीत प्रभागात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या कामांच्या जोरावर आगामी काळात पुन्हा एकदा जनसेवेची संधी मिळेल, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार भाजप पॅनलने केला आहे. प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांनी ‘कमळ’ या चिन्हावर मतदान करून भाजप पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
एकजूट, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक प्रचाराला लक्षणीय वेग मिळाल्याचे चित्र दिसून आले.








