आज रात्रीपासून मालिका ‘भाबीजी घर पर है २.०’ पाहायला विसरू नका, ज्‍यामागे आहेत ५ प्रमुख कारणे!

By: Editor_Manas

On: Monday, December 29, 2025 3:03 PM

Google News
Follow Us

विनोद, हृदयस्‍पर्शी भावना आणि संस्‍मरणीय पात्रांचे संयोजन असलेल्‍या लोकप्रिय विनोदी मालिकेचे मनोरंजन देण्‍यासाठी प्रसिद्ध असलेले चॅनेल एण्‍ड टीव्‍ही मालिका ‘भाबीजी घर पर है २.०’सह नवीन उत्‍साही अध्‍याय घेऊन येत आहे. ही मालिका २२ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता सुरू होत आहे. प्रेक्षक या मालिकेचे स्ट्रिमिंग हिंदी झी5वर देखील पाहू शकतात. नवीन उत्‍साहवर्धक वातावरण, सर्वोत्तम कथानक आणि अलौकिक शक्‍तीसह लोकप्रिय मालिका नवीन उत्‍साहासह परतत आहे, जेथे जुन्‍या आठवणींना उजाळा देण्‍यासोबत नॉन-स्‍टॉप मनोरंजन मिळेल. ही मालिका पाहायला चुकवू नये यामागील पाच कारणे पुढीलप्रमाणे:

  1. शिल्‍पा शिंदे १० वर्षांनंतर अंगूरी भाबीच्‍या भूमिकेत पुनरागमन करत आहेत.

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय पात्र दीर्घकाळानंतर परतत आहे. खऱ्या अंगूरी भाबीच्‍या भूमिकेत पुनरागमन करत असलेल्‍या शिल्‍पा शिंदे निरागसता, मोहकता आणि संस्‍मरणीय विनोदी शैली पुन्‍हा घेऊन येत आहेत, ज्‍याचा प्रेक्षकांनी दशकापासून आनंद घेतला आहे. त्‍यांच्‍या पुनरागमानासह जुन्‍या आठवणी पुन्‍हा ताज्‍या झाल्‍या आहेत, तसेच या नवीन अध्‍यायामध्‍ये भावनिकतेची देखील भर झाली आहे.

     2. घुंघटगंजमध्‍ये कॉमेडीसोबत थरारक मनोरंजन

यावेळी हास्‍यासोबत रहस्‍याचे मनोरंजन देखील मिळणार आहे. रहस्‍यमय घुंघटगंज नगरामध्‍ये परंपरेसोबत घुंघटमागील रोमांच व सिक्रेट्सचा उलगडा होणार आहे. मालिकेने उत्‍साही अलौकिक शक्‍तीसंदर्भात कथानक आणले आहे, ज्‍यासह त्‍यांच्‍या लोकप्रिय विनोदामध्‍ये नवीन उत्‍साहीपणा, सस्‍पेंस आणि अनपेक्षिततेची भर केली आहे.

     3. नवीन पात्रं नवीन ऊर्जा आणि अनपेक्षित ट्विस्‍ट्स घेऊन आले आहेत.

विलक्षण नवीन चेहरे कथानकामध्‍ये प्रवेश करण्‍यासह गोंधळ अधिक वाढला आहे, ज्‍यामधून भरपूर मनोरंजन मिळेल. हे पात्र नवीन गतीशीलता, अचंबित करणारे परस्‍परसंवाद आणि सर्वोत्तम कथानक सादर करतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक एपिसोड अधिक उत्‍साहवर्धक, सर्वसमावेशक आणि अनपेक्षित असणार आहे.

    4.भाबीजीची अदलाबदल – ओळखीचे चेहरे, नवीन धमाल

मालिका ‘भाबीजी घर पर है २.०’चे सर्वात मोठे आकर्षण म्‍हणजे भाबीजींची अदलाबदल, ज्‍यामुळे विनोदी गोंधळ, उच्‍चस्‍तरीय ड्रामा आणि हसवून-हसवून लोटपोट करणाऱ्या क्षणांचे मनोरंजन मिळेल. पात्रांना या ट्विस्‍टचा सामना करताना त्‍यांच्‍यामधील नवीन केमिस्‍ट्री पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांना आवडलेल्‍या कॉमेडीमधील पूर्णत: नवीन मनोरंजन मिळेल. 

    5.सर्वोत्तम कौटुंबिक मनोरंजन, जे तुम्‍हाला उत्‍साहित करेल

मालिका ‘भाबीजी घर पर है २.०’मध्‍ये हलके-फुलके, तणाव दूर करणारे विनोद आहेत. उत्‍साहीपणा, निरागसता व हास्‍यासह नवीन उत्‍साहवर्धक वातावरण व नवीन ऊर्जा घेऊन येत ही मालिका दीर्घकाळानंतर वेगळा अनुभव देणार आहे, जेथे कुटुंबातील सर्वांना मनमुराद मनोरंजनाचा आनंद मिळेल.

पहा ‘भाबीजी घर पर है २.०’ आज रात्रीपासून एण्‍ड टीव्‍हीवर आणि स्ट्रिमिंग हिंदी झी5 वर, दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026