टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटने लाँच केला टायटॅनियम एसआयएफ, (टाटा म्युच्युअल फंडद्वारे ऑफर केलेला) – संतुलित, जोखीम-समायोजित वाढीसाठी उद्दिष्ट असलेला हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड

मुंबई | नोव्हेंबर 2025: टाटा म्युच्युअल फंडने ऑफर केलेल्या टायटॅनियम स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडची (SIF) घोषणा टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटने केली आहे. ही एक हायब्रिड दीर्घ-लघु गुंतवणूक रणनिती आहे जी गुंतवणूकदारांना चांगल्या, जोखीम-समायोजित परिणामांसह मार्केटच्या अनेक टप्प्यांमध्ये नॅव्हिगेट करण्यास मदत करेल. तसेच त्यासाठी इक्विटी, कर्ज आणि डेरिव्हेटिव्ह एक्सपोजर वेगाने एकत्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवते. नवीन फंड ऑफर 24 नोव्हेंबर 2025 रोजी उघडेल आणि 8 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. जास्त जोखीम घेण्यास तयार असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड डिझाइन केला आहे, ज्यांची एएमसीमध्ये पॅन स्तरावर सर्व एसआयएफमध्ये किमान 10 लाख रुपयांची तिकिट साईझ आहे.

हायब्रिड लाँग-शॉर्ट श्रेणीमधील हा फंड इक्विटी आणि डेबिटसाठी किमान 25% वाटप आणि शॉर्ट इन्स्ट्रुमेंट्समध्ये जास्तीत जास्त 25% अनहेज्ड एक्सपोजर राखतो. हे अनोखे मिश्रण फंडला इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्समध्ये लाँग पोझिशन्सद्वारे बाजारातील चढउतारांमध्ये सहभागी होण्यास, शॉर्ट स्ट्रॅटेजीज आणि आर्बिट्रेजद्वारे डाउनसाइड जोखीम कमी करण्यास आणि कर्जाद्वारे संभाव्य परताव्याची अनुमती देते. या अंतर्गत रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REITs) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये (InvITs) देखील गुंतवणूक करता येते.

दीर्घ आणि अल्पकालीन गुंतवणूकीचे सक्रिय व्यवस्थापन करून, हा फंड मार्केट ट्रेंडवर कमी अवलंबून राहात कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. हे धोरण इक्विटी डेरिव्हेटिव्ह्जचा वापर करून बाजारातील दृष्टिकोन कुशलतेने सांगते, तसेच वाढत्या आणि घसरणाऱ्या दोन्ही स्टॉकच्या अनुषंगाने संधी पटकावते. तसेच अस्थिर टप्प्यांमध्ये जोखीम व्यवस्थापित करते. इक्विटी, कर्ज आणि डेरिव्हेटिव्ह्जमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्याचा हा दृष्टिकोन पोर्टफोलिओ कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने आहे.

फंड लॉन्च करताना टाटा ॲसेट मॅनेजमेंटचे चीफ बिझनेस ऑफिसर आनंद वरदराजन म्हणाले, “एसआयएफ फ्रेमवर्कची ओळख भारतातील गुंतवणूक क्षेत्रात एक महत्त्वाची उत्क्रांती दर्शवतेज्यामुळे अधिक आधुनिक परंतु सुव्यवस्थित धोरणांसाठी जागा निर्माण होते. गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करणे हे आमचे लक्ष्य आहे. त्याबरोबरच ज्या तत्त्वांच्या आधारे हा व्यवसाय सुरू झाला ती जपणे आणि संपत्ती निर्मिती दीर्घकाळासाठी करणे याकडेही आमचे लक्ष आहे. मार्केट हे कायम अस्थिर असतेतो त्याचा स्वभाव आहे. जवळजवळ 65% वेळा मार्केटमध्ये तेजी असते तर 35% वेळा मार्केट पडतेअसे आमचे निरीक्षण आहे. या परिस्थितीचा विचार करता गुंतवणूकदार पोर्टफोलिओ परतावा निर्माण करण्यासाठी तेजीच्या टप्प्याची वाट पाहत असतात. एसआयएफची ओळख गुंतवणूकदारांना हेजिंग आणि डेरिव्हेटिव्ह्ज वापरून घसरणीच्या किंवा ट्रेंडलेस मार्केटचा संभाव्य फायदा घेण्यास अनुमती देते. आमच्या टायटॅनियम एसआयएफ धोरणांचे उद्दिष्ट या अपेक्षा पूर्ण करणे हे आहे.”

टायटॅनियम एसआयएफचे फंड मॅनेजर सूरज नंदा म्हणाले, “टायटॅनियम हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड एक वेगळा गुंतवणूक दृष्टिकोन आणतो जो वैविध्यपूर्ण  एक्सपोजर व्यवस्थापनाद्वारे जोखीम तसेच रिवॉर्ड संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. एसआयएफ फ्रेमवर्क बाजारातील बदलांशी जुळवून घेऊ शकतील अशी  धोरणे डिझाइन करण्यासाठी अधिक लवचिकता प्रदान करतो. दीर्घ तसेच लघु धोरणांचा वापर करून, फंड अस्थिरता नियंत्रित करतानाच जोखीम-समायोजित परतावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. वाढीच्या क्षमतेशी तडजोड न करता संभाव्य स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक महत्त्वाचा फायदा आहे.”

सेबीने सादर केलेले एसआयएफ फ्रेमवर्क म्युच्युअल फंड आणि एआयएफ/पीएमएस स्ट्रक्चर्समधील दरी भरून काढते, ज्यामुळे फंड हाऊसेसना नियमन केलेल्या आणि कर-कार्यक्षम वातावरणात नावीन्यपूर्ण, लवचिक उत्पादने ऑफर करण्याची परवानगी मिळते. एएमसीमध्ये पॅन स्तरावर एसआयएफमध्ये किमान 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीसह, हे फ्रेमवर्क वेगळ्या धोरणांचा शोध घेणाऱ्या गुंतवणूकदारांना उत्तम सेवा देते, ज्यामध्ये नावीन्यपूर्णतेसह जोखीम व्यवस्थापनाचा विचारपूर्वक मेळ घालला जातो.

टायटॅनियम एसआयएफ – हायब्रिड लाँग-शॉर्ट फंडची सुरुवात टाटा अ‍ॅसेट मॅनेजमेंटच्या नावीन्यपूर्ण, संशोधन-चलित गुंतवणूक उपायांची निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. यामुळे गुंतवणूकदारांना मार्केट सायकलमध्ये दीर्घकालीन संपत्ती निर्मिती साध्य करणे शक्य होते.