“मालिका ‘भाबीजी घर पर है’ माझ्या करिअरला कलाटणी देणारी ठरली आहे”, असे शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या

एण्‍ड टीव्‍हीवरील सुपरहिट मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये मोहक अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे निरागस अभिव्‍यक्‍ती आणि उत्तम कॉमिक टाइमिंगसह घराघरामध्‍ये लोकप्रिय बनल्‍या आहेत. अभिनेत्री या यशाचे श्रेय मालिकेला देतात, जी त्‍यांच्‍या अभिनय प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरली आहे. वर्षानुवर्षे मालिका ‘भाबीजी घर पर है’ने त्‍यांना प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळवून देण्‍यासोबत व्‍यावसायिकदृष्‍ट्या व वैयक्तिकदृष्‍ट्या कलाकार म्‍हणून अधिक निपुण होण्‍यास देखील मदत केली आहे. 

करिअर आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबाबत सांगताना त्‍या म्‍हणाल्‍या, ”मालिका ‘भाबीजी घर पर है’ माझ्या करिअरला कलाटणी देणारी ठरली आहे. या मालिकेने मला खूप प्रतिष्‍ठा देण्‍यासोबत अभिनेत्री व व्‍यक्‍ती म्‍हणून विकसित होण्‍यास देखील मदत केली आहे. अंगूरी भाबीची भूमिका साकारताना मला सातत्‍य, शिस्‍तबद्धता व संयम या मूल्‍यांची शिकवण मिळाली आहे. सतत स्‍पर्धा असलेल्‍या इंडस्‍ट्रीमध्‍ये मला शिकवण मिळाली आहे की, इतरांसोबत तुलना करण्‍याऐवजी स्‍वत:ची कला निपुण करत राहणे सर्वोत्तम आहे. यासारख्‍या संधी घडत नाहीत तर अथक मेहनत व योग्‍य वृत्तीसह निर्माण कराव्‍या लागतात. माझा दृढ विश्वास आहे की नशीब उज्‍ज्‍वल भविष्‍याचा दरवाजा उघडेल, पण तुमचा प्रामाणिकपणा व समर्पितता महत्त्‍वाचे आहेत, ज्‍यामुळे तुम्‍ही त्‍या क्षेत्रात प्रगती करू शकता.”

आपली ध्‍येये व भावी महत्त्वाकांक्षाांबाबत सांगताना शुभांगी पुढे म्‍हणाल्‍या, ”माझ्या करिअरच्‍या या टप्‍प्‍यावर मी अशा भूमिकांना प्राधान्‍य देते, ज्‍या मला आव्‍हान देतात आणि अभिनेत्री म्‍हणून निपुण होण्‍यास मदत करतात. मला माझ्या मुलीसाठी आदर्श स्‍थापित करायचा आहे की निर्धार, आत्‍मविश्वास व शिस्‍तबद्धतेसह तुम्‍ही प्रत्‍येक गोष्‍टीचे व्‍यवस्‍थापन करू शकता आणि तुमची स्‍वप्‍ने साकारू शकता.”

मोहक शुभांगी अत्रे यांना अंगूरी भाबीच्‍या भूमिकेत पाहण्‍यासाठी पाहत राहा मालिका ‘भाबीजी घर पर है’ रात्री दर सोमवार ते शुक्रवार १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!