पुणे- देशातील आघाडीच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फोनपेने उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेसोबत भागीदारी करत ‘विश’ क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. हे कार्ड नियत ठेवीच्या (फिक्स्ड डिपॉझिट) पाठबळावर आधारित असून क्रेडिट क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे.
फोनपे अॅपवरून हे कार्ड सहज अर्ज करता येते, ज्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, लवचिक आणि डिजिटल अनुभव मिळतो. या कार्डात नियत ठेवीची सुरक्षितता आणि क्रेडिट कार्डची लवचिकता यांचा संगम साधला असून स्वरोजगार करणारे, गृहिणी, तरुण पिढी (Gen Z) तसेच लहान शहरांतील ग्राहकांसाठी हे उपयुक्त ठरणार आहे.
केवळ ₹2000च्या ठेवीवर हे कार्ड मिळू शकते आणि नियत ठेवीवर व्याजाचा लाभही मिळतो. ‘विश’ हे रुपे नेटवर्कवरील कार्ड असल्याने यूपीआयद्वारे व्यवहार करता येतात आणि विविध व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. फोनपे अॅपवरून केलेल्या रिचार्ज व बिल भरण्यावर ३% रिवॉर्ड पॉइंट्स, निवडक ई-कॉमर्स ब्रँड्सवरील खरेदीवर १% रिवॉर्ड पॉइंट्स, तसेच स्कॅन अँड पे व्यवहारांवरही १% रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. दरमहा ₹१५,००० खर्चावर २०० बोनस रिवॉर्ड पॉइंट्सही दिले जातात, आणि रिडम्प्शन प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे (१ रिवॉर्ड पॉइंट = ₹१).
या भागीदारीबद्दल फोनपेचे पेमेंट प्रमुख दीप अग्रवाल यांनी सांगितले की, उत्कर्ष बँकेसोबतचे सहकार्य हे वित्तीय समावेशनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग यांनी सांगितले की, हे उत्पादन पारंपरिक बँकिंग आणि नव्या युगातील डिजिटल बँकिंग यांचा उत्तम संगम असून ग्राहकांच्या इच्छापूर्तीचे प्रतीक आहे.