आर्मी बॉईज, नेव्हल टाटा संघ उपांत्यपूर्व फेरीत

पुणे, ऑक्टोबर: राउंड ग्लास अकादमी, आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी, ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी आणि गुमानहेरा अकादमी संघांनी म्हाळुंगे (बालेवाडी) येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या नवव्या एसएनबीपी अखिल भारतीय (१६ वर्षांखालील मुले) हॉकी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी गुरुवारी आपापल्या गटात दुसरा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश केला. 

तिसऱ्या दिवशी शुक्रवारी, गतविजेता आणि उपविजेत्या राउंड ग्लास (क गट) आणि आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी संघांनी (ड गट) अनुक्रमे इन्फिनिटी अकादमी आणि ग्रासरूट्स हॉकी – उत्तर प्रदेशवर सहज विजय मिळवत अंतिम ८ संघांमधील स्थान निश्चित केले.

राउंड ग्लास संघाने इन्फिनिटी एच.ए. संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. वरिंदर सिंगने (२०, २२, २३, २४, ५३व्या मिनिटाला) हॅटट्रिकसह पाच गोल करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. रोमित पाल (७, ४९व्या मिनिटाला) आणि अर्जनदीप सिंगने (१२व्या मिनिटाला) त्याला चांगली साथ दिली. 

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सामन्यात, आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने इन्फिनिटी अकादमी अँड ग्रासरूट्स हॉकी – उत्तर प्रदेशवर ४-१ असा विजय मिळवला.

अर्जुनचे दोन (३, ४६व्या मिनिटाला) तसेच अर्कित बरुआ (२५व्या मिनिटाला) आणि प्रशांत ऐंद यांनी (५०व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करत विजयात योगदान दिले. तमिळनाडू संघाकडून एकमेव गोल कार्तिक यादवने (५८व्या मिनिटाला) केला.

एका एकतर्फी सामन्यात (अ गट) ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूटने हॉकी युनिट ऑफ तमिळनाडूचा १०-० असा मोठ्या फरकाने पराभव केला. माझी मोहनची (७’, २८’, ३७व्या मिनिटाला) गोल हॅटट्रिक, प्रकाश लाक्राचे (२०’, २४व्या मिनिटाला) दोन तसेच विकास माझी (१३व्या मिनिटाला), सुनील बार्ला (१४व्या मिनिटाला), साजीत एक्का (५९व्या मिनिटाला), अजिब लुगुन (तिसऱ्या मिनिटाला) आणि आशिक सुरीनने (सहाव्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करत संघाचा मोठा साकारला.

गुरुवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या सामन्यांत, गुमनहेरा अकादमीने त्रिपुरा ग्रासरूटविरुद्धचा त्यांचा दुसरा सामना १५-० असा जिंकून ब गटामध्ये आघाडीवर राहून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यजमान एसएनबीपी अकादमीने नीरज लांडगेच्या (८’, १९’, ४१’, ५३’, ५५’) सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर हॉकी नाशिकचा ६-३ असा पराभव केला. मी गटवार साखळीतील त्यांचा हा पहिला विजय मिळवला.

क्वार्टरफायनलसाठी पात्र ठरलेले संघ पुढीलप्रमाणे: अ गट-ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी, ब: गट गुमनहेरा अकादमी, क गट: राउंड ग्लास अकादमी, ड गट: आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी.

निकाल (तिसरा दिवस)

ड गट: आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी: ४ (अर्जुन ३’, ४६’; अर्कित बरुआ २५’; प्रशांत ऐंद ५०’) विजयी वि. ग्रासरूट्स हॉकी-उत्तर प्रदेश: १ (कार्तिक यादव ५८’). मध्यंतर: 2-0

अ गट: ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट: 10 (अजिब लुगुन 3’; आशिक सुरीन 6’; माझी मोहन 7’, 28’, 37’; विकास माझी 13’; सुनील बार्ला 14’; प्रकाश लाक्रा 20’, 24’; सुजीत एक्का 59′) विजयी वि. हॉकी युनिट ऑफ तमिळनाडू 0. मध्यंतर: 8-0

क गट: राऊंड ग्लास अकादमी: ८ (रोमित पाल ७’, ४९’; अर्जनदीप सिंग १२’; वरिंदर सिंग २०’, २२’, २३’, २४’; ५३’) विजयी वि. इन्फिनिटी हॉकी अकादमी: ०. मध्यंतर: ६-०

ग गट: सेल एचए: ५ (सुमन किंडो ४’; अरुण लाक्रा २२’, ५७’; विकास काथे 49’; विकास कुंजूर ५१’) विजयी वि. विजय एचए: १ (अश्वनी पटेल ३६’). मध्यंतर: 2-0.

गुरुवारचे सामने 

ब गट: गुमनहेरा अकादमी: १५ (जय रवींद्र २’, १०’, ३६’; सिद्धार्थ राजू ४’, ८’, ५७’; कटारिया हितेश २३’, ३५’; कार्तिक दिनेश २७’, ४२’; आर्यन सिनू ४०’; यशवंत सेहरावत ४०’; यशवंत ४१’; 47’; देव विक्रम 51’) विजयी वि. त्रिपुरा ग्रासरूट्स: 0. मध्यंतर: 6-0

ह गट: एसएनबीपी अकादमी: ६ (नीरज लांडगे ८’, १९’, ४१’, ५३’, ५५’; ठाकूर सिद्धार्थ २१’) विजयी वि. हॉकी नाशिक : ३ (पारस बर्वे १’; मोहमद समीद २५’; सबोध जाधव ३६’). मध्यंतर: 2-1