निर्लज्जपणाचा कळस : सुनेच्या मृत्यूने अख्खा महाराष्ट्र रडतोय तर तिकडं सासऱ्याचा मटणावर ताव (VIDEO)

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 6:20 AM

Google News
Follow Us

निर्लज्जपणाचा कळस : सुनेच्या मृत्यूने अख्खा महाराष्ट्र रडतोय तर तिकडं सासऱ्याचा मटणावर ताव (VIDEO)

पुणे – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेपूर्वी फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही तळेगावमधील एका हॉटेलमध्ये मटण खाताना दिसत आहेत. सूनेच्या आत्महत्येनंतरही कुठलाही पश्चाताप नसल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

Vaishnavi Hagawane Death Case Updates : राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक; खेडेगावात लपून बसले होते, सात दिवसांपासून फरार; सीसीटीव्हीत दिसले अन् पोलिसांनी सापळा रचला, अशी झाली राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणे यांना अटक

विवादास्पद व्हिडिओमुळे जनतेत संताप : वैष्णवी हिने १६ मे रोजी सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर राजेंद्र आणि सुशील हगवणे हे फरार झाले होते. त्यांचा शोध घेत असलेल्या पोलिसांनी अखेर त्यांना शुक्रवारी पहाटे अटक केली. मात्र अटकेआधी त्यांनी आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या बिनधास्त वागणुकीवर तीव्र टीका होत आहे.

Vaishnavi Hagwane Case NEW1

Navale Bridge | नवले पुलावर दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय? पोलिसांकडून दुर्लक्ष?; स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल (Video)

वैष्णवीवरील अन्याय आणि छळ : वैष्णवीच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपानुसार, हगवणे कुटुंबीयांनी दोन कोटी रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती. यासाठी तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या प्रकरणात आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासू, नणंद करिष्मा, दीर सुशील आणि सासरे राजेंद्र अशा पाच जणांना अटक झाली आहे.

Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर

बालक सुपूर्द आणि मकोकाची मागणी : वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या लहान बाळाची जबाबदारी आता तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणात ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

हा प्रकार केवळ कौटुंबिक हिंसाचाराचं दाहक उदाहरण नसून, आरोपींच्या निर्लज्ज वागणुकीमुळे समाजात तीव्र अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now