Navale Bridge | नवले पुलावर दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय? पोलिसांकडून दुर्लक्ष?; स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल (Video)

By: Editor_Pratik

On: Thursday, May 22, 2025 6:34 PM

Google News
Follow Us

पुणे, सिंहगड रोड (प्रतिनिधी) – पुण्यातील सिंहगड रोडवरील नवले पुल परिसरात भरदिवसा खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराला पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याचा ठपका नागरिकांनी ठेवला असून, पोलिसांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

‘पुणे प्रहार’शी बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, नवले पुलावर आणि आजूबाजूच्या परिसरात काही महिलांचा भरदिवसा संशयास्पद हालचालींचा वावर सुरू असतो. अनेक वेळा या महिलांनी वाटसरूंना थांबवून खुलेआम अश्लील सूचनाही दिल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि कुटुंबीयांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते.

पोलिसांकडून दुर्लक्ष?

स्थानिकांचे म्हणणे आहे की, नवले पुलाजवळील परिसर हा वाहतूकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून येथे नेहमीच गाड्यांची वर्दळ असते. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अश्लील हालचालींमुळे परिसराचे सौंदर्य, सुरक्षितता आणि सामाजिक वातावरण बिघडत आहे. या सर्व प्रकारांकडे स्थानिक पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

“पोलीस येतात, पण कारवाई नाही”

काही नागरिकांनी सांगितले की, “आम्ही अनेक वेळा पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलीस वेळोवेळी येतातही, पण कुठलीच ठोस कारवाई करत नाहीत. काही वेळेस चेतावणी देऊन सोडून दिले जाते, आणि दुसऱ्याच दिवशी तोच प्रकार पुन्हा सुरू होतो.”

कुटुंबीयांची गैरसोय 

या प्रकरणामुळे परिसरात राहणाऱ्या कुटुंबीयांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “या प्रकारामुळे आमच्या मुलींना एकटं सोडता येत नाही. हा रस्ता टाळावा लागतो,” असे एका महिला रहिवाशांनी सांगितले.

पोलिस प्रशासनाचे मौन

या संदर्भात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान मिळालेले नाही. मात्र ‘पुणे प्रहार’ने या प्रकरणाची दखल घेतली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 16, 2026

September 15, 2026