Nilesh Chavan : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ, निलेश चव्हाणचे कारनामे

By: Editor_Pratik

On: Friday, May 23, 2025 7:14 AM

Google News
Follow Us

Nilesh Chavan : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ, निलेश चव्हाणचे कारनामे

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात नाव समोर आलेल्या निलेश चव्हाणविरोधात आणखी गंभीर माहिती उघड झाली आहे. स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणी २०१९ मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे, निलेशने आपल्या पत्नीसोबतचे शारीरिक संबंध स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने रेकॉर्ड केले होते.

निर्लज्जपणाचा कळस : सुनेच्या मृत्यूने अख्खा महाराष्ट्र रडतोय तर तिकडं सासऱ्याचा मटणावर ताव (VIDEO)

सीलिंग फॅन आणि एसीत लपवलेले कॅमेरे : निलेशचे लग्न ३ जून २०१८ रोजी झाले. मात्र काही महिन्यांनंतर पत्नीला त्यांच्या बेडरूममधील सीलिंग फॅन व एसीमध्ये काहीतरी संशयास्पद दिसले. पुढे तिच्या लॅपटॉपमधून तिचे आणि निलेशचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले. यामध्ये इतर महिलांसोबतचे व्हिडिओही असल्याचे समोर आले आहे.

Vaishnavi Hagawane Death Case Updates : राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक; खेडेगावात लपून बसले होते, सात दिवसांपासून फरार; सीसीटीव्हीत दिसले अन् पोलिसांनी सापळा रचला, अशी झाली राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणे यांना अटक

धमकी, मारहाण, आणि कुटुंबीयांचाही छळ : पत्नीने याबाबत विचारणा केल्यावर निलेशने तिला चाकू दाखवून धमकावले, मारहाण केली आणि तिच्याकडून दागिने व पैसे हिसकावले. ही माहिती तिने निलेशच्या आई-वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट तिचाच छळ सुरू करण्यात आला.

Navale Bridge | नवले पुलावर दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय? पोलिसांकडून दुर्लक्ष?; स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल (Video)

गुन्हा दाखल, पण अटक नाही : २०२२ मध्ये वारजे पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला पण अटक करण्यात ढिलाई केली. निलेशला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संधी दिल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला, पण उच्च न्यायालयाने त्याला संरक्षण दिलं.

हगवणे कुटुंबीयांशी सख्याचे संबंध : निलेश चव्हाण आणि वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे तसेच करिष्मा हगवणे हे एकमेकांचे जवळचे मित्र होते. वैष्णवीवर अन्याय होत असताना मध्यस्थीची बोलणी निलेशच्या करवेनगरमधील ऑफिसमध्ये झाल्याचे समोर आले आहे.

Pune Rain Update : पुण्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा; ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर

नवजात बाळालाही त्रास : वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या नवजात बाळाला निलेश चव्हाणच्या घरी ठेवण्यात आले होते. सतत रडणाऱ्या बाळाची जबाबदारी झटकण्यासाठी हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्यांना बोलावले. मात्र बाळ न्यायला गेलेल्या कसपटे कुटुंबीयांना निलेशने पिस्तुल दाखवून धमकावले. या प्रकरणात धमकावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असला, तरी बाळाला बळजबरीने ताब्यात ठेवल्याबाबत अपहरणाचा गुन्हा मात्र नोंदवण्यात आलेला नाही.

पोलिसांवर संशय, कायद्याची मागणी : या संपूर्ण प्रकरणात वारजे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पीडित पक्षाने निलेश चव्हाणवर बाल अपहरण, विनयभंग व मानसिक अत्याचाराचे गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील विकृती, महिलांवरील छळ, आणि प्रभावशाली गुन्हेगारांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा चेहरा समोर आणला आहे. कायद्याने कठोर भूमिका घेऊन आरोपींना योग्य शिक्षा करावी, अशी मागणी सोशल मीडियावरून जोर धरत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now