पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती आली समोर…मुळशी, भोर, पुरंदर, हवेली, आणि खेडमधील पुढील ३२ गावांची…

By: Editor_Pratik

On: Sunday, April 20, 2025 10:42 AM

Ring-Road
Google News
Follow Us

पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती आली समोर…मुळशी, भोर, पुरंदर, हवेली, आणि खेडमधील पुढील ३२ गावांची…

पुणे : सध्या पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागातील जमिनीचे संपादन पूर्ण होत आले आहे. त्या भागात कामांसाठी कंपन्यांना आदेश दिल्याने त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले आहे. पूर्व भागाच्या २६५ हेक्टर भूसंपादनापैकी आतापर्यंत ३० हेक्टरचे संपादन शिल्लक आहे. याबाबत सध्या हालचाली देखील सुरु करण्यात आल्या आहेत.

अभिनेत्रीला न सांगता दिग्दर्शकाने शूट केला बलात्काराचा सीन, भडकलेल्या अभिनेत्रीने नंतर केलेलं असं काही की…

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’तर्फे रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे.

Pune Congress : पुण्यात काँग्रेसला मोठं खिंडार; आधी धंगेकर आता संग्राम थोपटेंच्या पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोलसाठी पक्षापुढं मोठं आव्हान

याबाबत संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत.

Ring-Road

रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.

Paneer : पनीरबाबात अत्यंत धक्कादायक खुलासा; 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत समोर आले भयानक सत्य

एमएसआरडीसीने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

BIG NEWS : ठाकरे बंधूनंतर आता अजितदादा-शरद पवारही एकत्र येणार? पवार घराण्यातील व्यक्तीनेच…

आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे.

Nithari Case : अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या; देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडाला १९ वर्षे पूर्ण; अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक पालक

तसेच नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे, हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे.

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसचे निष्ठावंत बडे नेते भाजपाच्या वाटेवर, पक्ष सोडण्याचे कारण…

Tax Officer Suicide : साखरपुड्यातच होणाऱ्या बायकोची बॉयफ्रेंडला मिठी, IT अधिकारी असलेल्या नवरदेवाला धक्का; नंतर घडलं असं की…

“गौरी खानच्या हाय-प्रोफाईल रेस्टॉरंटमध्ये ‘बनावट पनीर’? १९ वर्षाच्या इन्फ्लुएंसरच्या व्हिडिओनं उडवली खळबळ!”

BIG NEWS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल; ‘राज ठाकरेंचं वर्तन तालिबानी पद्धतीचं’

लाडकी बहीण योजना : एप्रिलचा हप्ता १५०० रुपये मिळणार की फक्त ५००? जाणून घ्या सविस्तर माहिती!

अश्लील फोटो, शारीरिक संबंध… संजय बांगर यांच्या मुलीचा भारतीय क्रिकेटपटूवर खळबळजनक आरोप!

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now