मुंबईतील हाई-एंड रेस्टॉरंट ‘Torii’, जे बॉलीवूडची प्रसिद्ध डिझायनर गौरी खान यांच्या मालकीचं आहे, सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतंय — आणि कारण आहे “बनावट पनीर”!
१९ वर्षाच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं रेस्टॉरंटमध्ये मिळालेल्या पनीरवर थेट आयोडीन टेस्ट केली आणि त्यात स्टार्च असल्याचा दावा करत व्हिडिओ टाकला. हा व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला आणि नेटिझन्सच्या भुवया उंचावल्या.
पण रेस्टॉरंटने दिलेलं स्पष्टीकरण थोडं वेगळंच आहे. त्यांनी म्हटलं आहे, “आमच्या डिशमध्ये सोयाबीन-आधारित घटक असल्यामुळे आयोडीन टेस्टमध्ये स्टार्च दिसणं हे सामान्य आहे. आमचं पनीर शुद्ध असून, कोणत्याही प्रकारचा फसवणूक किंवा बनावटपणा नाही.”
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे — एका बाजूला इन्फ्लुएंसरचा दावा, तर दुसरीकडे रेस्टॉरंटचा आत्मविश्वास!
https://www.instagram.com/p/DIi0JuXP0tl/?img_index=1
पण खरी गोष्ट काय आहे? ‘Torii’चं पनीर खरोखर बनावट आहे की हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट?
पाहा, व्हायरल व्हिडिओ आणि ठरवा स्वतः!