Accident : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ३५ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

By: Editor_Pratik

On: Friday, April 18, 2025 3:51 AM

Accident
Google News
Follow Us

Accident : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ३५ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

बुलढाणा : एक मोठी अपघाताची घटना घडलीये. आंध्रप्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली आणि ३५ जण जखमी झाले आहेत. ही घटना नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ घडली. बुलढाणा जिल्ह्यात मुख्यतः घाटाखाली मागील दोन आठवड्यामध्ये तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये जवळपास आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच रात्री मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला. ज्यामध्ये जवळपास ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, सुदैवाने यात जीवितहाणी झाली नाहीये.

Pratik Gangane : प्रतिक गंगणे यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्कार जाहीर

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास ३५ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे हे विभागीय गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर, बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या

Accident

जवळच असलेल्या एका धाब्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर १० जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आला. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते. ३ दिवसा अगोदर देखील याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्यप्रदेश परिवहनची बस व विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन ३ जण ठार तर १८ जण जखमी झाले होते.

वरिष्ठ क्रिकेटपटूने केली होती शरीरसुखाची मागणी; संजय बांगरचा मुलगा आर्यनने सांगितलं का केला लिंगबदल… उघड केलं भयावह सत्य…

त्यापूर्वीच मागील आठवड्यात देखील खामगाव शेगाव मार्गावर एक तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला होता. त्यामध्ये देखील सहा जणांचा मृत्यू झाला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जसजसे आता पर्यटक घराबाहेर पडत आहे आणि वाहनांचा सुसाट वेग गुळगुळीत रस्ते अनियंत्रित वेग यामुळे मुख्यतः सकाळच्याच वेळेस आणि रात्रीच्या वेळेस हे अपघात झाल्याचे समोर येत आहे. अनेक वेळा रस्ते परिवहन महामंडळाच्या वतीने सूचनाफलक धोक्याचे वळण याबाबत जनजागृती नामनिर्देशक फलक हे जागोजागी लावलेले असतात. मात्र, याकडे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात.

पाण्याचे बिल न भरल्यास नळजोड बंद, फसवणूकीचा नवा प्रकार

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026