पुण्यात यंदा १० व्या चर्चासत्रात कॅनेडियन वूडची क्रिएटीसिटी आणि एफएफएससीची भागीदारी, लाकूडच्या शाश्वत उपायाबाबत प्रात्यक्षिके सादर केली

ब्रिटिश कोलंबिया सरकारच्या क्राउन कॉर्पोरेशन आणि कॅनेडियन वूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या फॉरेस्ट्री इनोव्हेशन कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमेटेडने आज पुण्यात खास शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विविध प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. दोन्ही कंपन्यांकडून पुण्यात यंदा १० वे चर्चासत्र पार पडले. द कॅनेडियन वूड – द सस्टेनेबल सोल्यूशन एण्ड अ लाइव्ह डेमो बाय एक्सपर्ट कार्पेंटर असे या कार्यशाळेचे शीर्षक होते. या कार्यशाळेत विविध विषयांवरील उपाययोजना आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला. कॅनेडियन वूडसह क्रिएटीसिटी एण्ड फर्निचर आणि फिटिंग्ज स्किल काऊन्सिल (एफएफएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाची १०वे चर्चासत्र यशस्वीरित्या पार पडले.

 या कार्यशाळेत आर्किटेक्ट, डिझाइनर आणि लाकूडकाम करणा-या कर्मचा-यांनीही सहभाग घेतला. कॅनेडियन लाकूड फर्निचरसाठी वापरल्यास त्याचे फायदे आणि टिकाऊपणाबद्दल सहभागी तज्ज्ञांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना माहिती दिली.  माहितीचे सादरीकरण आणि थेट प्रात्यक्षिकांचे सादरीकरण अशा दोन वर्गवारीत चर्चासत्र विभागण्यात आले.

 कॅनेडियन वूडचे भारतातील संचालक श्री. प्रणेश छिब्बर, कॅनेडियन वूडच्या तांत्रिक सेवेचे उपसंचालक श्री. जिम्मी थॉमस आणि कॅनेडियन वूडच्या व्यवसाय विकासाचे उपसंचालक श्री. गजानन पाटणकर यांनी चर्चासत्राच्या सुरुवातीलाच आपल्या सादरीकरणातून कॅनेडियन लाकडाबाबतची सर्व माहिती दिली. यात

टिकाऊ लाकडाचे स्त्रोत, त्याचे सर्वांगीण फायदे, विविध प्रकल्पांमधील फर्निचर बनवण्यासाठी कॅनेडियन लाकूडाच्या प्रजातीचे लाकूड वापरल्यास होणारे फायदे इत्यादी विषयांवर उपस्थितांना माहिती दिली.

 क्रिएटिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेश एम. आणि एफएफएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल मेहता यांनी शैक्षणिक चर्चासत्रातील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. आर्किटेक्टक डिझायनिंगमधील माहिती मिळवण्यासाठी तसेच विविध प्रात्यक्षिक कौशल्ये जाणून घेण्यासाठी चर्चासत्राकरिता होणा-या भागीदारी आवश्यक असतात असे क्रिएटिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेश एम. यांनी सांगितले. फर्निचर प्रक्रिया, डिझायनिंगमधील भविष्यातील शाश्वत उपायांचे महत्त्व आणि कौशल्यता यांचे महत्त्व श्री. मेहता यांनी आपल्या सादरीकरणातून पटवून दिले. यासह एफएफएससीच्या कौशल्य विकासाबाबतही त्यांनी माहिती दिली गेली. तज्ज्ञांनी या चर्चासत्राला उपस्थित लोकांच्या प्रश्नांचे शंकानिरासनही केले. त्याकरिता प्रश्नोत्तराच्या तासाचेही नियोजन करण्यात आले होते.

 चर्चासत्राच्या दुस-या भागांत एफएफएससीच्या कार्पेंटरतज्ज्ञांनी लाकडापासून फर्निचर बनवण्याची प्रात्यक्षिके सर्वांसमोर सादर केली. फर्निचर बनवताना कॅनेडियन वूडच्या पाचही प्रजातीच्या लाकडांचा वापर केला गेला. नव्या डिझाइन्सचे फर्निचर बनवताना कॅनियन वूडच्या वापराचा टिकाऊपणा आणि फायदे याबद्दलही माहिती दिली गेली.

 या शैक्षणिक चर्चासत्राबद्दल श्री. प्रणेश छिब्बर यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, फर्निचर उत्पादनांतील लाकडांची वाढती मागणी हे फर्निचर डिझायनिंगच्याही पलीकडे दिसून येत आहे. लाकडाचा वापर करताना त्यात पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजना असावी असाही मोठा मतप्रवाह दिसून येत आहे. लाकडाच्या वापरात प्रमाणित दर्जा वापरला जाण्याविषयीची जगभरातून मागणी आहे. ही मागणी लक्षात घेत कॅनेडियन लाकडाचा फर्निचर निर्मितीतील वापर पूरक ठरतो. पुणे येथे आर्किटेक्ट आणि फर्निचर उत्पादकांची संख्या लक्षणीय प्रमाणावर वाढत आहे. परिणामी, पुणे हे फर्निचरर निर्मितीतील आघाडीचे शहर म्हणून ओळखले जात आहे. शाश्वत उपाययोजनांचा अंमलबजावणीत जनजागृतीसाठी तसेच त्यातील कौशल्य वृद्धिकरणासाठी आम्ही आमचे अनुभव मांडण्यासाठी कटिबद्ध आहोत. या उत्साही उद्योगसमूहाकडून लाकूड कारागिरीतील टिकाऊपणा आणि नावीन्यपूर्णतेतील बदलांबाबत पाठिंबा देण्यात आला आहे.

 क्रिएटिसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ महेश एम. यांनीही छिब्बर यांच्या मताला सहमती दर्शवत आपले मत मांडले. ते म्हणाले, फर्निचरनिर्मितीतील अमर्यादित क्षमता जाणून घेण्या-या समान मतप्रवाह असलेल्या संघटनांसाठी या चर्चासत्राचे आयोजन केले गेले. आम्ही गेली १८ वर्ष पुण्यातील फर्निचर रिटेलर विक्रेते आणि उत्पादकांसोबत काम करत आहोत. आमच्या मते, या चर्चासत्रातून प्रात्यक्षिकांच्या मदतीने कॅनेडियन वूड हे फर्निचर तसेच इतर सर्व लाकूड उत्पादनांसाठी वापरण्यासाठी सुयोग्य असल्याचे दर्शवणे योग्य ठरते. येत्या काळात ही मागणी सातत्याने वाढत राहील अशा त-हेनेच आम्ही या चर्चासत्रातून संबंधित उत्पादनाची प्रभावशाली वैशिष्ट्ये सादर करीत आहोत. क्रिएटीसिटीच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सर्वोत्तम दर्ज्याची वैविध्यता असलेले कॅनेडियन लाकडाची समाधानकारक उत्पादने दाखवली, हा आम्हांला विश्वास आहे.

 एफएफएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल मेहता यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले,  आम्ही कॅनेडियन वूडसोबतच्या दीर्घकालीन भागीदारीत उत्पादनांच्या निर्मितीसह कौशल्य विकासाला गती देण्यावरही भर देत आहोत. या भागीदारीतून आपल्या देशाला लाकडाचा सुयोग्य वापर कसा करावा तसेच या व्यवसायातील क्षमतेबाबत संपूर्ण ज्ञान मिळेल. आम्ही फर्निचर फिटिंग काऊन्सिलच्या माध्यमातून विविध योजनांना पाठिंबा देतो. विविध प्रकल्पातील कामांना आवश्यक कच्च्या मालाच्या पुरवठ्यापासून ते लाकूड उत्पादनातील व्यावसायिकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकडे आम्ही लक्ष पुरवतो. या प्रशिक्षण कार्यक्रमात डिझाइन्स, उत्पादन तसेच व्यवसाय विकासाबाबतची इत्यंभूत माहिती पुरवली जाते.

आमच्या चर्चासत्रातून लाकडाच्या वापरातील शाश्वत समस्या, विविध वापरांबद्दल माहिती दिली जाते. परिणामी लाकडाच्या वापराविषयीचे मिथक दूर सारण्यास मदत होते. आम्हांला फर्निचर व्यवासायातील वाढत्या संधीबाबत सर्वांना माहिती देत जागरुक करायचे आहे. मशीनच्या साहाय्याने कोणा-या कारागिरीतून आता या व्यवसायातील करिअरच्या नव्या संधी खुणावत आहेत. यातून बेरोजगारी दूर सारली जात आहे, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे आमचे लक्ष आहे.

 या चर्चासत्रात देशभरातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीला सर्वांची दाद मिळाली. अनेकांनी प्रात्यक्षिकांचे कौतुकही केले. या शैक्षणिक चर्चासत्रात लाकडाच्या उत्पादनातील डिझान्सबद्दल प्रकर्षाने चर्चा झाली. पर्यावरणपूरक लाकूड म्हणून कॅनेडियन लाकडाच्या वापराबाबत सर्वांनी आपापली सहमती दर्शवली.

 कॅनेडातील बीसी येथील जंगलातून भारतात पुरवल्या जाणा-या पाचही लाकडांच्या प्रजातीच्या उत्पादननिर्मितीतील वापराबाबत एफआयआयकडूनही शिफारस दिली जाते. डोग्लाज फिर, वेस्टर्न हेमलॉक, वेस्टर्न रेड कॅडर, येलो कॅडर आणि स्प्र्सूस पाइन फिर (एसपीएफ) अशी या लाकडांच्या प्रजातींची नावे आहेत. फर्निचर तसेच लाकूड उत्पादनांसाठी या लाकडांचा देशभरातील तीसहून अधिक स्टॉकिस्टच्या नेटवर्कच्या मदतीने १७ शहरांमध्ये पुरवठा होतो.