सोनाटाने आपल्या नव्या वेडिंग कॅम्पेन ‘ग्रो, टुगेदर’मध्ये सादर केला आधुनिक भारतीय विवाहांचा बदलता चेहरा

By: Editor_Manas

On: Tuesday, June 9, 2026 12:02 PM

Google News
Follow Us

राष्ट्रीय09 June 2026:  आजचे विवाहबंध केवळ परंपरेपुरते मर्यादित राहिलेले नाहीततर दोन व्यक्तींनी एकत्र पाहिलेली स्वप्नेरोजचे छोटे-मोठे क्षण आणि एकमेकांच्या महत्त्वाकांक्षांना दिलेली साथ यांनी ते समृद्ध होत आहेत. नात्यांच्या या बदलत्या आणि प्रगतीशील चेहऱ्याचे प्रतिबिंब उमटवतभारतातील सर्वाधिक विकला जाणारा घड्याळांचा ब्रँड ‘सोनाटा’ने आपले नवे वेडिंग कॅम्पेन ‘ग्रोटुगेदर’ आणि त्यासोबतच खास डिझाईन केलेले नवीन वेडिंग वॉच कलेक्शन सादर केले आहे. सोनाटाच्या नव्या कॅम्पेनमध्ये लग्नाच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन आजच्या काळातील जोडप्यांचा वैयक्तिकव्यावसायिक आणि भावनिक स्तरावरील सहप्रवास अधोरेखित करण्यात आला आहे. आधुनिक नातेसंबंध आणि लग्नानिमित्त भेटींसाठी हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि समकालीन दृष्टिकोन आहे.

हे नवे कॅम्पेन सोनाटा वेडिंगच्या आधीच्याच ड्रीमटुगेदर या भावस्पर्शी संकल्पनेला पुढे नेणारे असले तरी, हे लग्नाच्या दिवसापुरते मर्यादित नाही. एकमेकांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या आणि वैयक्तिक प्रगतीत एकमेकांचे साथीदार बनणाऱ्या जोडप्यांचा हा एक सुंदर उत्सव आहे. या कॅम्पेनमध्ये प्रसिद्ध फोटोग्राफर जोसेफ राधिक आणि वेडिंग डिझायनर देविका नारायण यांची गोष्ट सांगितली आहे. जोडीदार म्हणून एकमेकांसोबत जीवनप्रवास करताना या दोघांनीही स्वतःची स्वतंत्र ओळख पुरेपूर जपली आणि यशस्वी करिअर घडवले आहे. अनेक भागांच्या डिजिटल स्टोरीटेलिंग सिरीजच्या माध्यमातून, हे कॅम्पेन सहजीवन, जीवनसंघर्ष, जिद्द आणि बदलांचे खरेखुरे क्षण टिपते. आजची लग्ने फक्त ‘एक होण्याबद्दल’ नसून, एकत्र मिळून ‘काहीतरी नवीन घडवण्याबद्दल’ आहेत, हेच यातून दिसते.

सोनाटाचे ब्रँड हेडपुलक नारायण यांनी सांगितले, भारतातील वेडिंग मार्केट ही एक अत्यंत गतिमान बाजारपेठ आहेजी आजच्या आधुनिक जोडप्यांच्या आकांक्षांनुसार सातत्याने बदलत आहे. ‘ग्रोटुगेदर‘ या कॅम्पेनद्वारे आम्ही अशा तरुण पिढीशी संवाद साधत आहोतज्यांच्यासाठी लग्न म्हणजे जीवनातील निरंतर प्रगतीचा प्रवास आहेत्यांच्या दृष्टीने लग्नबंध हे जोडीदारांना वैयक्तिक आणि दोघांनी मिळून पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सक्षम बनवतातआमचे नवीन वेडिंग कलेक्शन याच विचारसरणीचे सुंदर प्रतिबिंब आहेही घड्याळे केवळ वेळ दाखवत नाहीततर दोघांनी एकत्र मिळून घडवलेल्या प्रगतीची आणि सुंदर सहजीवनाची साक्ष देतात.”

या कॅम्पेनसोबतच सोनाटाने सादर केले आहे आपले नवे वेडिंग कलेक्शन! आधुनिक विवाह सोहळ्यांना अनुरूप अशी आकर्षक ‘पेअर वॉचेस’ (जोडप्यांसाठीची घड्याळे) आणि उत्सवांचा आनंद दर्शवणारी डिझाईन्स यामध्ये आहेत. मनमोहक गोल्डन-टोन डिझाईन्स, मल्टिफंक्शन डायल्स आणि उत्कृष्ट मेटॅलिक स्ट्रॅप्सचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. लग्नसमारंभ असो किंवा कोणताही सण-उत्सव, ही घड्याळे सुयोग्य, शाही लूक देतात.

शानदार स्टाईल आणि वापराच्या दृष्टीने अष्टपैलू यांचा मिलाप साधत डिझाईन करण्यात आलेल्या या घड्याळांमध्ये मिळतात मल्टिफंक्शन डायल्स, टेक्स्चर्ड मेटॅलिक ब्रेसलेट्स, स्लीक राऊंड केसेस आणि आधुनिक डायल डिटेलिंग! लग्नसमारंभ असो किंवा रोजचा वापर असो, ही घड्याळे तुम्ही अगदी सहज वापरू शकता. पुरुषांच्या कलेक्शनमध्ये मल्टिफंक्शन ग्रीन आणि ब्लू डायल्स, गोल्ड फिनिश आणि आकर्षक मेटॅलिक बांधणीसह बोल्ड फेस्टिव्ह स्टाईल पाहायला मिळते. तर दुसरीकडे, महिलांचे कलेक्शन मिनिमलिस्ट व्हाईट व शॅम्पेन डायल्स, स्लिम ब्रेसलेट्स आणि ज्वेलरी-इन्स्पायर्ड डिझाईन्सच्या माध्यमातून अधिक नाजूक आणि सुबक सौंदर्य समोर आणते.

या कलेक्शनमधील मॅचिंग ‘पेअर वॉचेस’ (जोडप्यांसाठीची घड्याळे) एकमेकांना पूरक असणाऱ्या अशा डिझाईन्सची आहेत. ही घड्याळे सहजीवनाची संकल्पना अधिक दृढ करतात, हुबेहूब एकमेकांसारखी नसली तरी एकमेकांचे प्रतिबिंब वाटतात. ही घड्याळे आजच्या आधुनिक नातेसंबंधांचे अचूक दर्शन घडवते, जिथे वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सहजीवन एकत्र नांदतात. एक मौल्यवान आठवण म्हणून तयार केलेले हे कलेक्शन आकांक्षा आणि सुलभता यांचा उत्तम मेळ साधते — ज्यामुळे लग्नकार्यात जोडप्यांसाठी, कुटुंबासाठी आणि आप्तांसाठी ही घड्याळे आदर्श भेटवस्तू ठरतात.

सोनाटा वेडिंग कलेक्शनमधील घड्याळांच्या किमती ₹१,४९५ ते ₹४,४९५ दरम्यान आहेत. त्यामुळे तुमचे बजेट कितीही असो, लग्नासाठी उत्कृष्ट गिफ्टिंगचे पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. हे कलेक्शन देशभरातील सोनाटा स्टोअर्स, टायटन वर्ल्ड आउटलेट्स आणि आघाडीच्या रिटेल चॅनेल्सवर उपलब्ध आहे, तसेच सोनाटा वॉचेसच्या अधिकृत वेबसाईटवरही ऑनलाईन खरेदी करता येतील.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026