हेन्‍केलकडून भारतातील कुरकुंभ येथील कार्बन-न्‍यूट्रल प्लांटसह कार्बन-मुक्त कामकाजाला गती

By: Editor_Manas

On: Tuesday, June 9, 2026 11:36 AM

Google News
Follow Us

पुणे, जून ९, २०२६ : हेन्‍केलने आपल्या अ‍ॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीज व्यवसायांतर्गत जागतिक शाश्वतता धोरणाला गती देण्यामध्ये मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने भारतातील कुरकुंभ आणि तुर्कीतील गेबकीम येथे कार्बन-न्‍यूट्रल उत्पादन साध्य केले आहे. या उत्पादन केंद्रांनी स्कोप १ आणि स्कोप २ उत्सर्जन यशस्वीरित्या पूर्णपणे बंद केले आहे, जे २०३० पर्यंत आपले कामकाज कार्बन-मुक्त करण्याच्या हेन्‍केलच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हे यश हेन्‍केलच्या विज्ञान-आधारित हवामान उद्दिष्टांमध्ये आणखी योगदान देत आहे. हे उद्दिष्ट जागतिक स्तरावर सर्व उत्पादन केंद्रांमध्ये अक्षय ऊर्जेचा विस्तार करत असताना ऊर्जा कार्यक्षमता, विद्युतीकरण आणि जीवाश्म इंधनांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करून कामकाजातील ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते.

कुरकुंभ येथे फर्नेस ऑइलवर आधारित थर्मिक फ्लुइड हीटर्सच्या जागी उच्च-कार्यक्षमतेच्या इलेक्ट्रिक यंत्रणा आणून कार्बन-न्‍यूट्रल कामकाज साध्य करण्यात आले, ज्यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर पूर्णपणे बंद झाला.

या परिवर्तनासाठी प्लांटच्या ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा करणे आवश्यक होते, ज्यामध्ये उष्णतेच्या भाराचे अनुकूलन, प्रगत उच्च-कार्यक्षमतेच्या हीट एक्सचेंजर्सची स्थापना आणि संपूर्ण विद्युतीकरणाला सहाय्य करण्यासाठी विद्युत क्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचा समावेश होता. १०० टक्‍के अक्षय विजेच्या वापरासह घेतलेल्या या उपायांमुळे स्कोप १ आणि स्कोप २ मधील सुमारे ११,३०० टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन पूर्णपणे बंद करणे शक्य झाले, जे या प्लांटच्या डिकार्बनायझेशन प्रवासातील मोठा मैलाचा दगड ठरले आहे.

तुर्कीतील आपल्या गेबकीम प्लांटमध्ये हेन्‍केलने नैसर्गिक वायूवर चालणारे बॉयलर पूर्णपणे बदलून त्याऐवजी उच्च-कार्यक्षमतेची इलेक्ट्रिक बॉयलर यंत्रणा लागू केली आहे, ज्‍यासह ऐतिहासिक विद्युतीकरण प्रकल्प राबवला आहे. या परिवर्तनामुळे प्लांटमधील प्रत्‍यक्ष जीवाश्म इंधनाचा वापर बंद झाला आणि स्कोप १ उत्सर्जन शून्यावर आले, ज्यामुळे वार्षिक सुमारे ९५६ टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य घट झाली.

या नवीन महत्त्‍वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्त करत हेन्‍केल अ‍ॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीजचे सप्लाय चेन अँड ऑपरेशन्‍स आयएमईएचे उपाध्यक्ष सायमन उलमन म्हणाले, “आमच्या प्रमुख फ्लॅगशिप साइट्सपैकी दोन ठिकाणी कार्बन-न्‍यूट्रल उत्पादन साध्य करणे हे हेन्‍केल अ‍ॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीजच्या जागतिक शाश्वतता महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

“आमची महत्त्वाकांक्षा स्पष्ट आहे: आम्ही आमच्या सर्व कामकाजातून जीवाश्म इंधन पद्धतशीरपणे काढून टाकत आहोत आणि त्याऐवजी अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या विद्युतीकरण प्रक्रियेचा अवलंब करत आहोत. कुरकुंभ आणि गेबकीम या दोन्ही ठिकाणी आमच्‍या यशस्‍वी उत्‍पादन टप्‍प्‍यामधून निदर्शनास येते की आम्ही आमचे धोरण प्लांट पातळीवर ठोस प्रभाव निर्माण करू शकते, ज्यामुळे शून्य-उत्सर्जन कामकाजाच्या दिशेने आमच्या प्रवासाला गती मिळेल.”

“आमच्या कुरकुंभ प्लांटमध्ये कार्बन न्‍यूट्रॅलिटी साध्य करणे हे शाश्वत विकास, जबाबदार उत्पादन आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीप्रती आमची दृढ कटिबद्धता अधोरेखित करते,” असे हेन्‍केल अ‍ॅडेसिव्ह टेक्नॉलॉजीजचे भारतातील ऑपरेशन्स अँड प्रोजेक्ट्सचे डायरेक्‍टर बाप्पा बंडोपाध्याय म्हणाले. “अक्षय ऊर्जेचा अवलंब आणि कार्यक्षमतेत सातत्याने केलेल्या सुधारणांच्या माध्यमातून आम्ही सुरक्षा, गुणवत्ता आणि कामगिरीच्या उच्च मानकांचे पालन करत आमचे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरित्या कमी केले आहे. या यशस्‍वी टप्‍प्‍यामधून निदर्शनास येते की, शाश्वतता आणि व्यावसायिक कामगिरी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी एकत्र पुढे जाऊ शकतात,” असे ते पुढे म्‍हणाले.

विद्युतीकरण आणि अक्षय ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवून हेन्‍केल आपल्या जागतिक उत्पादन नेटवर्कचे डिकार्बनायझेशन वेगाने करत आहे. हे परिवर्तन कंपनीचे कामकाज आणि मूल्य साखळीतील कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या व्यापक निव्वळ-शून्य महत्त्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, तसेच ग्राहकांना त्यांची स्वतःची शाश्वतता उद्दिष्टे साध्य करण्यास सक्षम करते. हा मैलाचा दगड शाश्वत उद्योगाच्या दिशेने परिवर्तनाचे नेतृत्व करण्याच्या हेन्‍केलच्या कटिबद्धतेला सादर करतो, तसेच सिद्ध करतो की जीवाश्म इंधनमुक्त उत्पादन सर्व क्षेत्रांमध्ये साध्य करणे आणि वाढवणे शक्य आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026

June 9, 2026