महागाईच्या विळख्यात अडकलेल्या सलून व्यावसायिकाला साथ द्या – बंधू चव्हाण

By: Editor_Manas

On: Tuesday, June 9, 2026 5:50 PM

Google News
Follow Us

मुंबई : सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने सलून दरामध्ये 20 टक्के वाढ करण्याचा जो निर्णय घेतला तो खरोखरच सलून व्यावसायिका साठी खूप गरजेचा होता. या निर्णयाकरिता सलून व्यावसायिकांच्या कुटुंबाकडून मी सलूनब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रसाद चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष श्री तुषार चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम यांना मनापासून धन्यवाद देतो.

सलून व्यवसाय करण्याकरता लागणारी सौंदर्य प्रसाधने, कारागिरांचे पगार, सलून मेंटेनन्स, दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि इतर बऱ्याच गोष्टी यांची वाढलेली महागाई पाहता सलून व्यावसायिकाच्या दृष्टीने ही दरवाढ होणे गरजेचं होतं. सलून व्यावसायिक त्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात अनेक संस्थां चांगलं काम करत आहेत त्या देखील या निर्णयाचे स्वागत करतील याची मला पूर्ण खात्री आहे. या निर्णयामुळे सलून व्यावसायिकाला सलून व्यवसाय करण्यासाठी एक नवी उमेद मिळेल. सलून व्यावसायिकांच्या पाठीशी कायम उभी राहणाऱ्या या संस्थापक श्री. दत्तात्रय चव्हाण यांच्या सलून ब्युटीपार्लर असोसिएशन या संस्थेचे जास्तीत जास्त सभासद सलून व्यावसायिकांनी व्हावं जेणेकरून असे तुमच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी त्या संस्थेला अजून बळ मिळेल असं आवाहन मी या निमित्ताने करतो.

महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून विनंती आपल्या सगळ्यांप्रमाणेच आपला हा सलून बांधव महागाईच्या विळख्यात अडकलाय त्या सलून व्यावसायिकाच्या पाठीशी उभे रहा.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 14, 2026

August 14, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 13, 2026

August 11, 2026