पुणे प्रहार डेस्क – आपल्या आजूबाजूला अशा अनेक गमतीशीर घटना घडत असतात, ज्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक वेळा या सर्व गोष्टी चर्चेचा विषय देखील बनत असतात. अशीच एक घटना घडलेली आहे. आपल्यापैकी अनेक जण पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी बँकेत जात असतात. बँकेचा व्यवहार करताना आपण चेक किंवा डिपॉझिट स्लिप भरून पैसे काढत असतो. अनेकदा चेक भरताना किंवा डिपॉझिट स्लिप भरताना काही माहिती भरता आली नाही तर दुसऱ्यांना विचारून ती माहिती भरण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे काही महाशय असतात, जे काही ना काही करामती करत असतात. असाच प्रकार घडलेला आहे आणि हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झालेला आहे.
एका महिलेने चेकवर असे काही लिहिले आहे, ज्यामुळे या महिलेचा चेक सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सोशल मीडियावर या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे.
नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सर्वसाधारण बजेट सादर केले. या अर्थसंकल्पातील 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कर सवलत दिल्यामुळे मध्यमवर्गीयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु अर्थसंकल्पामध्ये झालेले बदल सर्वसामान्य व्यक्तींना समजायला वेळ लागतो त्यापैकी अनेक जण बँकेमध्ये जाऊन व्यवहार करत असताना अनेक अडचणी देखील येत असतात. एका महिलेने बँकेत गेल्यावर चेकवर असे काही लिहिले ज्यामुळे कॅशियरला रडावे किंवा हसावे कळत नव्हते. ही घटना आयडीबीआय बँकेतील आहे. महिलेने केलेला हा प्रकार सर्वांसाठी आश्चर्यजनक होता. या महिलेचा चेक व ही महिला सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे.
बँकेतील पैसे काढण्यासाठी व पैसे भरण्यासाठी आपण स्लिप भरत असतो, अशावेळी एखादी माहिती जर कळाली नाही तर आपण इतरांची मदत देखील घेत असतो परंतु या महिलेने खुद्द चेकवर किती पैसे हवे आहेत त्या ठिकाणी बँकेत जितके असतील तितके द्या असे हिंदीमध्ये लिहिलेले आहे म्हणजेच ” बँक मे जितना हो उतना ” हे वाचून कॅशियर देखील थक्क झाला.
हा चेक आयडीबीआय बँकेचा आहे. घडलेली घटना हास्यास्पद असली तरी या घटनेवर सोशल मीडिया मधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.