VIDEO : पुणे : हिंजवडीत अपघाताचा थरार ! भरधाव डंपर उलटून अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन तरुणींचा जागीच मृत्यू
पुणे: हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी झाला अन् त्याखाली चिरडून शेजारून दुचाकीवरून चाललेल्या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्रांजली महेश यादव (वय- २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि आश्लेषा नरेंद्र गावंडे (वय- २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळुंगे, ता. मुळशी, मूळ शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवार (दि.२४) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
भरधाव डंपर दोन तरुणींच्या अंगावर आला त्यावेळी तेथून एक तरुणही दुचाकीवरून चालला होता. मात्र डंपर उलटत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. रेडीमिक्स डंपरच्या चालकाने मद्यपान केल्याची माहिती आहे. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Motorola Moto G85 किंमत झाली कमी, कंपनीने केले ग्राहकांना आवाहन!