टाटा मोटर्स आणि सारस्वत बँकेत रिटेल वित्तपुरवठ्यासाठी भागीदारी

पुणे – टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (टीएमपीव्ही), टाटा पँसेंजर इलेक्ट्रिक मोबिलीटी (टीपीईएम) या टाटा मोटर्स कंपनीतील सहाय्यक कंपन्यांनी आज सारस्वत बँकेसोबत करार केला. या करारानंअंतर्गत टाटा मोटर्सकडून इंटर्नल कंबश्चन इंजिन (आयसीई) आणि इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना ऑटो रिटेल वित्तपुरवठा उपाययोजना दिल्या जातील.

या करारामुळे ग्राहकांना स्पर्धात्मक व्याजदर दराचा फायदा घेता येणार आहे. ज्यामुळे टाटा मोर्टर्स उत्पादन पोर्टफोलिओतील ग्राहकांना लोकप्रिय प्रवासी वाहने कंपनीला उपलब्ध करून देता येतील. या सामंजस्य करारावर टाटा मोटर्स आणि सारस्वत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.

या भागीदारीबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मुख्य वित्तीय अधिकारी आणि टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि.चे उपाध्यक्ष धीमन गुप्ता म्हणाले की, ” सारस्वत बँकेसोबतची ही भागीदारी टाटा मोटर्सच्या आयसीई व ईव्हीज उपलब्ध करून देणे आणि त्याचवेळी आमच्या ग्राहकांना एक सुलभ व आनंददायी अनुभव देण्यासाठी महत्त्वाची आहे.”

या निमित्ताने बोलताना सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले की, “आम्हाला टाटा मोटर्ससोबत भागीदारी करून आमच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या कस्टमाइज्ड आणि स्पर्धात्मक वित्तपुरवठा योजना देताना खूप आनंद होत आहे. त्यांचे उद्दिष्ट वाहनखरेदी सुलभ आणि लवचिक करण्याचे आहे. या भागीदारीद्वारे देशात ईव्ही संस्कृतीला चालना देत असतानाच आम्ही आमच्या ग्राहकांना व्यापक पर्याय निवडण्याची संधी देऊ शकतो.”