पुणे प्रहार डेस्क – राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात .आपला रोखठोक स्वभाव व वादग्रस्त विधान अशी ओळख असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सर्वांना माहिती आहे. अनेकदा त्यांनी वेगवेगळ्या सभेमध्ये, बैठकीत कार्यकर्त्यांना चांगले सुनावले आहे. असाच प्रकार बारामतीत एका कार्यक्रमांमध्ये घडला.
अजित पवार हे व्यासपीठावर भाषण देत असताना कार्यकर्त्यांकडून वारंवार निवेदन देण्यात येत होते. एकदा – दोनदा सांगून देखील ही निवेदन मात्र काही थांबायचे नाव घेत नव्हते, अशावेळी वैतागून अजित पवारांनी थेट कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. कार्यकर्त्यांवर संतापलेले माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले. या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मतदारांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहायला मिळाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा राज्यभर होत आहे. माननीय उपमुख्यमंत्री बारामतीत तालुका सहकारी खरेदी विक्रीच्या संघाच्या पेट्रोल पंप इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला आले होते, त्यावेळी भाषण करताना अजित पवारांनी एक वक्तव्य केले. या वक्तव्याची चर्चा आता सुरू आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची वादग्रस्त विधाने कमी झाली होती परंतु आता पुन्हा अजित पवार यांनी यु टर्न घेतलेला पाहायला मिळत आहे म्हणूनच पुन्हा कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून आले.
या उद्घाटना वेळी त्यांनी तालुक्यातील फळ रोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कनेरी वन, उद्यान येथे भेट दिली. त्याचबरोबर सार्वजनिक विकास कामाची पाहणी देखील केली.
आपल्या नेत्याला निवडून देण्यासाठी कार्यकर्ता अक्षरशः जीवाचे रान करत असतो परंतु अशावेळी जर नेत्याकडूनच कार्यकर्त्याला नाराजी करणारे विधान ऐकायला मिळाल्यावर कार्यकर्ता हा आतून तुटून जातो. याच भाषणामध्ये अजित पवारांनी ” तुम्ही मला मतदान केले म्हणजे माझे मालक झाले नाही..” असे वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता पुढे अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांची मन राखण कशाप्रकारे करतात हे पाहणे उत्सुकताचे ठरेल.