थेऊर येथील एका तरुण हॉटेल चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे प्रहार डेस्क – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरांमध्ये आत्महत्येचे प्रकार घडून येताना दिसून येत आहेत. दिवसेंदिवस आत्महत्याचे होणारे प्रयत्न वाढत्या घटना यामुळे पोलीस अक्षरशः हैराण झालेले आहेत. अशीच एक घटना लोणी काळभोर येथे घडलेली आहे. एका तरुण हॉटेल व्यवसायिकेने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ही घटना दिनांक 5 जानेवारी रविवार रोजी घडली. ही घटना थेऊर येथे घडली आहे.

उदय उर्फ दादा सिद्धार्थ कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तपासांतर्गत विचारणा केल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार उदय यांचे आई-वडील चिंतामणी गणपतीच्या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून हार व फुले विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी उदय देखील हॉटेल चालवून मदत करायचा.

शुक्रवारी संध्याकाळी उदय आपल्या खोलीत गेला होता. उदयला उठवण्यासाठी त्याची बहीण रविवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गेली असता आतून कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने त्यांच्या मनात चिंता निर्माण झाली. दरवाजा तोडल्यावर उदयने साडीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळले.

ही घटना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, पोलीस हवालदार विजय जाधव व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले. उदयला लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरने घोषित केले. उदय ने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. उदय कोणत्या परिस्थितीमधून जात होता नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करत आहेत. ऐनतरुण वयात उदयाच्या जाण्याने घरच्यांवर शोककाळा पसरलेली आहे.