भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका आपल्या इंधन कार्यक्षम हेवी ड्युटी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपरिमित आनंद आणि असाधारण समाधान देण्यासाठी ओळखली जाते. आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला ‘भारताचा अभिमान’ असलेल्या सोनालीका ट्रॅक्टर्सने आर्थिक वर्ष २०२५ च्या केवळ चार महिन्यात एकंदर ५० हजार ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा ओलांडून नवा टप्पा गाठला आहे.
कंपनीने एप्रिल ते जुलै २०२४ या दरम्यान वार्षिक ५१,२६८ ट्रॅक्टर विक्रीची नोंद केली आहे. आपली दमदार वाढ साध्य करत असताना कंपनीने देशांतर्गत बाजारपेठेची कामगिरी मागे टाकली असून देशांतर्गत बाजारपेठेत अधिक वाटा काबीज करणाऱ्या आघाडीच्या कंपनीपैकी ती एक ठरली आहे. येत्या काही महिन्यात येणार असलेल्या सणांच्या सर्वात मोठ्या हंगामासाठी ट्रॅक्टर उद्योग तयार होत असताना या कामगिरीमुळे ब्रँडसाठी नवी दिशासुद्धा मिळाली आहे.
कृषी अर्थव्यवस्था आणि संबंधित क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने १.५२ दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे या युद्ध उद्योगाचे अर्थव्यवस्थेतील योगदान तर वाढणार आहेच, पण प्रगत कृषी यंत्रसामुग्रीसाठीची मागणीसुद्धा वाढणार आहे. भारतात शेतकऱ्यांच्या मागण्या प्रदेशानुसार बदलत जातात आणि एकच ट्रॅक्टर सर्वांसाठी कामाला येत नाही, यावर सोनालिकाचा पुरेपूर विश्वास आहे.
त्यामुळे तिच्याकडे २० ते १२० एचपीची ट्रॅक्टरची सर्वात मोठी श्रेणी आहे. या कस्टमाईज ट्रॅक्टर श्रेणीमध्ये हेवी ड्युटी मायलेज (एचडीएम)आणि सीआरडीएस इंजिन, मल्टी स्पीड ट्रान्समिशन्स आणि ५ जी हायड्रोलिक्स यांचा समावेश आहे. भारतीय शेतीच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टीने त्यांची रचना करण्यात आली आहे.
या अचंबित करणाऱ्या कामगिरीबद्दल आपले मत मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, आमच्या सशक्त दृष्टिकोनामुळे देशांतर्गत उद्योगाच्या कामगिरीला मागे टाकून बाजारपेठेतील वाटा काबीज करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक होणे आम्हाला शक्य झाले आहे.
सोनालिकाच्या जगातील क्रमांक एकच्या ट्रॅक्टर कारखान्यातील उत्पादनाच्या क्षमतेत हेवी ड्युटी इंजिन, ट्रान्समिशन्स, शीट मेटल इत्यादी बनविणे यांचा समावेश आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि ग्राहकांच्या गरजेनुसार ट्रॅक्टर तयार करणे आम्हाला शक्य होते.
म्हणून नवनवीन बाजारपेठांमध्ये आम्ही लवकर प्रवेश मिळू शकतो. केंद्राच्या २०२४ च्या अर्थसंकल्पात कृषी अर्थव्यवस्थेच्या उत्पादनावर पुन्हा भर देण्यात आला आहे. त्यातील नियोजित सुधारात्मक पावलांमुळे शेतीच्या यांत्रिकीकरणाला अधिक चालना मिळून मागणी वाढणार आहे.