स्‍कोडा ऑटो इंडिया कार्स आता गव्‍हर्नमेंट ई-मार्केटप्‍लेस (जीईएम) पोर्टलवर उपलब्‍ध

By: Editor_Pratik

On: Monday, August 19, 2024 4:14 PM

स्‍कोडा
Google News
Follow Us
  • गव्‍हर्नमेंट ई-मार्केटप्‍लेस (जीईएम) भारतातील एक-थांबा, राष्‍ट्रीय प्रोक्‍यूरमेंट ई-पोर्टल आहे
  • सार्वजनिक वस्‍तू व सेवांच्‍या ऑनलाइन खरेदीची सुविधा
  • ग्राहकांमध्‍ये केंद्र व राज्‍य सरकार मंत्रालये, विभाग, केंद्र व राज्‍य सार्वजनिक क्षेत्र उद्यम, स्‍वायत्त संस्‍था आणि स्‍थानिक सरकारी संस्‍थांचा समावेश आहे
  • जीईएम डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनच्‍या माध्‍यमातून सार्वजनिक खरेदीमधील कार्यक्षमता, पारदर्शकता व सर्वसमावेशकता वाढवणार
  • ई-बिडिंग, ई-ऑक्‍शन, रिव्‍हर्स ई-ऑक्शन आणि मागणी एकीकरण सुविधा देते
  • वर उल्‍लेख करण्‍यात आलेल्‍या सरकारी विभागांना जीईएम पोर्टलच्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष स्‍कोडा ऑटो इंडिया कार्स खरेदी करण्‍याची सुविधा आहे
  • कुशक आणि स्‍लाव्हिया या जीईएमच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध असलेल्‍या कार्स आहेत
  • मेड-इन-इंडिया उत्‍पादनांना चालना देणार

भारतातील बाजारपेठेत विकास व विस्‍तारीकरणाच्‍या दिशेने वाटचाल करत स्‍कोडा ऑटो इंडियाने आपल्‍या निवडक कार्ससाठी विक्रेती म्‍हणून गव्‍हर्नमेंट ई-मार्केटप्‍लेस (जीईएम) पोर्टलवर स्‍वत:ची नोंदणी केली आहे.

जीईएम या आर्थिक वर्ष अखेरपर्यंत दक्षिण कोरियाच्‍या कोनेप्‍सला (KONEPS) पार करत जगातील सर्वात मोठे सरकारी ई-प्रोक्‍यूरमेंट पोर्टल बनण्‍यास सज्‍ज आहे. जीईएम पोर्टलच्‍या माध्‍यमातून सरकारी ग्राहकाला पहिली स्‍कोडा वितरित करण्‍यात आली आहे.

प्‍लॅटफॉर्म

जीईएम पोर्टल सरकारी ग्राहकांसाठी राष्‍ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. हे एण्‍ड-टू-एण्‍ड ऑनलाइन मार्केटप्‍लेस आहे, जे केंद्र व राज्‍य मंत्रालये, विभाग, केंद्र व राज्‍य सार्वजनिक उद्यम, स्‍वायत्त संस्‍था आणि स्‍थानिक सरकारी संस्‍थांच्‍या माध्‍यमातून वस्‍तू व सेवांची खरेदी सुविधा देते. हे पोर्टल वाणिज्‍य व उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्‍या अखत्‍यारित आहे.

जीईएम पेपरलेस, कॅशलेस व कॉन्‍टॅक्‍टलेस इकोसिस्‍टम देते, जेथे सरकारी ग्राहक ऑनलाइन प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून भारतभरातील विक्रेते आणि सेवा प्रदात्‍यांकडून प्रत्‍यक्ष उत्‍पादने व सेवा खरेदी करू शकतात. प्‍लॅटफॉर्म भारतातील सार्वजनिक खरेदी यंत्रणांना नवीन रूप देण्‍यासाठी डिजिटलायझेशन व ऑटोमेशनसह चपळता आणि गतीचा वापर करते.

सोयीसुविधा आणि पारदर्शकता

जीईएमचा सार्वजनिक खरेदीमध्‍ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. प्‍लॅटफॉर्म ई-बिडिंग, ई-ऑक्‍शन, रिव्‍हर्स ई-ऑक्‍शन आणि मागणी एकीकरण सुविधा देते.

पोर्टल सरकारी विभागांना जीईएम पोर्टलवर सूचीबद्ध केलेल्‍या स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या ताफ्यामधील त्‍यांच्‍या कार्स खरेदी करण्‍याची सुविधा देते, तसेच स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या मेड-इन-इंडिया उत्‍पादनांचे प्रमोशन देखील करते. जीईएमच्‍या माध्‍यमातून सरकारी ग्राहकाला स्‍कोडाची पहिली डिलिव्‍हरी करण्‍यात आली आहे.

जीईएम स्‍कोडा

स्‍कोडा ऑटो इंडिया कार्सच्‍या पूर्णत: चाचणी केलेल्‍या ५-स्‍टार सुरक्षित ताफ्यासह सुसज्‍ज आहे. मेड-इन-इंडिया कुशक आणि स्‍लाव्हिया सध्‍या जीईएम पोर्टलवर उपलब्‍ध असलेल्‍या कार्स आहेत. दोन्‍ही कार्स विशेषत: भारतातील बाजारपेठेसाठी भारतातील व झेकमधील टीम्‍सने विकसित केलेल्‍या एमक्‍यूबी-एओ-इन प्‍लॅटफॉर्मवर आधारित आहेत, तसेच भारतामधून इतर देशांमध्‍ये देखील निर्यात केल्‍या जातात.

या दोन्‍ही कार्सना ग्‍लोबल एनसीएपीच्‍या नवीन टेस्‍ट प्रोटोकॉल्‍सअंतर्गत प्रौढ व्‍यक्‍ती आणि मुलांसाठी संपूर्ण ५-स्‍टार मिळाले आहे. कुशक एसयूव्‍ही आणि स्‍लाव्हिया सेदानमध्‍ये १.० टीएसआय व १.५ टीएसआय इंजिनची शक्‍ती आहे, जे सिक्‍स-स्‍पीड-मॅन्‍युअल किंवा सिक्‍स-स्‍पीड ऑटोमॅटिक किंवा सेव्‍हन-स्‍पीड डीएसजी ट्रान्‍समिशनसाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026