युवा सूर सरताज हे १५-३० वर्षे वयोगटातील नवोदित युवा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी एक प्रमुख व्यासपीठ आहे.
कौशिकी चक्रवर्ती, राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर यांसारखे नामवंत कलाकार या स्पर्धेचे परीक्षक असतील.
भारतातील इच्छुक युवा कलाकार या स्पर्धेसाठी युवा सूर सरताज डॉट इनवर (https://yuvasursartaj.in) नोंदणी करू शकतात.
भारत, १७ जुलै २०२४: भारत, १७ जुलै २०२४: झायडसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आतीश देधिया यांनी स्थापन केलेली व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि जतन करण्यासाठी समर्पित असलेली ना-नफा तत्ववर कार्यरत देधिया म्युझिक फाऊंडेशन (डीएमएफ) संस्थेने ‘युवा सूर सरताज २०२४’ ही या प्रतिभा शोध स्पर्धाची घोषणा केली आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील तरुण प्रतिभा शोधण्यासाठी अशा प्रकारची ही पहिली टॅलेंट हंट स्पर्धा आहे.
युवा सूर सरताजचे उद्दिष्ट हे उदयोन्मुख हिंदुस्थानी शास्त्रीय गायकांना मार्गदर्शक प्रदान करून देणे हे आहे. शिवाय हे त्यांना वाढीसाठी व ओळखीसाठी एक व्यासपीठ सुद्धा प्रदान करेल. श्रीमती कौशिकी चक्रवर्ती, श्री राहुल देशपांडे, आणि श्री संजीव अभ्यंकर यांसारखे भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज हे या स्पर्धेत परीक्षक असतील.
तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय क्षेत्रातील तरुण गायकांसाठी युवा सूर सरताज हा एक आनंददायी अनुभव असेल. युवा सूर सरताजच्या माध्यमातून तरुण कलाकार हे केवळ त्यांची कौशल्ये संधी दाखवण्याची मिळणार नाही तर त्यांना खास असा एक्स्पोजर देखील मिळेल. जोडीला या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवा कलाकारांना मेंटॉरशिप सपोर्ट देखील मिळणार आहे. हे देधिया म्युझिक फाऊंडेशनचे भारतातील समृद्ध संगीत वारसा जोपासण्यासाठी व या चिरंतन अश्या कलेच्या पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची अटूट बांधिलकी ही दर्शवते.
या प्रसंगी देधिया म्युझिक फाऊंडेशनचे संस्थापक आतीश देधिया म्हणाले की, ज्या युगात बहुतेक टॅलेंट शो पाश्चिमात्य संगीतावर लक्ष केंद्रित करत आहेत. तेव्हाच आम्ही देधिया म्युझिक फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्हाला तरुण मनांमध्ये देशाच्या समृद्ध संगीत वारसाचे
संगोपन करायचे आहे. युवा सूर सरताजच्या माध्यमातून आम्ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सौंदर्याकडे व त्यामध्ये असणाऱ्या खोलीकडे तरुणांचे लक्ष केंद्रित करू इच्छितो. ही स्पर्धा तीन टप्प्यात विभागली जाणार आहे. हे टप्पे म्हणजे स्पर्धेसाठी प्रवेशिकांची सुरुवात , व्हर्च्युअल ऑडिशन व शेवटी मुंबईतील नेहरू ऑडिटोरियममध्ये ग्रँड फिनाले. तर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी होणारी ग्रँड फिनाले ही सर्व सोशल मीडिया चॅनेलवर लाइव्ह-स्ट्रीम केली जाणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेशिकांची सुरुवात झाली असून इच्छुक सहभागी हे युवासूर सरताज डॉट इनवर (https://yuvasursartaj.in) नोंदणी करू शकतात.
पतियाळा घराण्याच्या सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती युवा सूर सरताज २०२४ च्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, युवा सूर सरताज हा देधिया म्युझिक फाउंडेशनचा भारताचा समृद्ध संगीत वारसा जतन आणि साजरा करण्यासाठीचा एक सुंदर उपक्रम आहे.
या सुंदर उपक्रमाचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. मला आशा आहे की आजची तरुण पिढी ही या सुंदर संगीत परंपरेला आत्मसात करण्यासाठी, शिकण्यासाठी व त्यात वाढ करण्यासाठी तसेच या संगीत वारशाला जतन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
युवा सूर सरताज २०२४ च्या विजेत्यांना केवळ रोख बक्षिसेच मिळणार नाहीत, तर त्यांचे शास्त्रीय गायन प्रशिक्षण आणि मार्गदर्शन चालू ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील मिळेल. युवा सूर सरताजमध्ये वयोगट १५वर्षे ते २२ वर्षे व वयोगट २३वर्षे ते ३० वर्षेमध्ये प्रत्येकी तीन बक्षिसे असतील. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रुपये १,५०,००० चा पुरस्कार मिळेल.
जोडीला मार्गदर्शनासाठी अतिरिक्त रुपये १,५०,००० प्राप्त होईल. पहिल्या उपविजेत्याला पुरस्काररुपी रुपये १,००,०००/- प्राप्त होईल. तर मार्गदर्शनासाठी रुपये १,००,०००/- ही प्राप्त होतील. तसेच शेवटी द्वितीय उपविजेत्याला पुरस्काररुपी रुपये ५०,०००/- व मार्गदर्शनासाठी ५०,०००/-प्राप्त होतील.
तसेच भारतीय गंधर्व महाविद्यालय, जी भारतीय शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी समर्पित असलेली प्रतिष्ठित संस्था आहे, ती युवा सूर सरताज २०२४ साठी अधिकृत संगीत संस्था भागीदार म्हणून कार्य करेल.