48 वि राष्ट्रीय आर्म स्पोर्ट स्पर्धा विरार मुंबई येथे संपन्न

दिनांक 28, जून ते 30 जून 2024 या दरम्यान 48 वि राष्ट्रीय आर्म स्पोर्ट स्पर्धा विरार मुंबई येथे संपन्न झाली. याप्रसंगी राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी श्री. विमल कुमार चंदा, सुमित सुशीलान, अरविंद चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय पंच व पुणे जिल्ह्याचे सेक्रेटरी विवेक माने यांनी पंच म्हणून काम पाहिले तसेच पुण्याचे पंच देविदास घोडके हे सुद्धा कार्यरत होते. या स्पर्धेत एकूण 15 राज्यातून 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र संघातून पुण्यातील 13 खेळाडूंची निवड झाली. त्यातील 11 खेळाडू विजेते झाले त्यांची नावे खालील प्रमाणे 90 किलो वजनी गटामध्ये (जूनियर)आदित्य राऊत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन चा मानकरी ठरला.
१) कार्तिक नागवडे 55 किलो वजनी गट (युथ) मेडल
२) तनुज पांडे 60 किलो वजनी गट (जुनिअर)सिल्वर मेडल.(उजवा हात)
३) क्षितिज चव्हाण 60 किलो वजनी गट (युथ) सिल्वर मेडल. (उजवा हात)
४)देविदास वी घोडके 65 किलो वजनी गट (सीनियर) ब्रांझ मेडल (डावा हात)
५) कुणाल शहा 65 किलो वजनी गट (युथ) ( गोल्ड मेडल) (उजवा हात)
६) संतोष वैद्य ७० 70kg (सीनियर) गोल्ड मेडल (उजवा हात)
७) श्रेणिक घनमोडे 70 वजनी गट (युथ) – ब्राउझ मेडल (उजवा हात )& गोल्ड मेडल (डावा हात)
८) सुशील उत्तम पांचाळ 80 किलो वजनी गट (मास्टर्स) सिल्वर मेडल (उजवा हात )
९) रोहन शिंदे 80 वजनी गट (युथ) ब्राँझ मेडल (उजवा हात)
१०) आदित्य राऊत 90+ वजनी गट (जूनियर )गोल्ड मेडल (उजवा हात)
११) असित अतुल गायकवाड 90+किलो वजनी गट (युथ) गोल्ड मेडल (उजवा हात)
श्री निलेश काळे संघटनेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.