सिक्स पॅक, मसल वाढवण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करू नका – निलेश काळे

सध्या पुणे शहरामधील तरुण तरुणाई ड्रग्स व अवैध्य पदार्थ सेवणात मशगूल आहे, त्यामुळे पोलिस यंत्रणा व महाराष्ट्र सरकार सतर्क असून योग्य ती कारवाई करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण – शारीरिक सेना (मनसे) फिटनेस व बॉडी बिल्डिंग मधे योग्य व्यायाम व आहार मार्गदर्शनाचे कार्य सुरवाती पासून करत आहे. तसेच अवैध पदार्थ व अनधिकृत सप्लिमेंन्टस विकणे व वापरणे याबद्दल सन्मानित मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे व म.राज्य आध्यक्ष डॉ. ऋषीसाहेब शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आधीपासून मोहीम राबवत आहे. श्री निलेश काळे मनसे शारिरिक सेना पुणे शहर अध्यक्ष यांनी याआधी उत्तेजक पदार्थांशी संबंधितांवर कारवाई पुणे शहरात केली आहे. अमली पदार्थ सेवनाचे तोटे बघाल तर फायद्यापेक्षा जास्त धोकादायक आहेत जर आपण त्याचा मिसयुज केलात तर यामध्ये :-

तरुण मुलां मुलींची नैसर्गिक वाढ थांबते,  उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल मध्ये बदल, हृदयविकाराचे झटके, हृदयाच्या समस्या, कर्करोग, यकृत रोग, किडणीचे नुकसान, आक्रमक वर्तन,  पुरुषांमध्ये टक्कल पडणे, स्तनाची वाढ ज्याला मॅनबुब्स बोलले जाते, शुक्राणूंची संख्या कमी, वंध्यत्व येणे, अंडकोष संकुचित होणे आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील बदल (कालावधी), शरीरावरील आणि चेहऱ्यावरील केसांची अनैसर्गिक वाढ, स्तनाचा आकार कमी होणे, टक्कल पडणे, आवाज पुरुषासारखा होणे इतके वाईट परिणाम होतात 

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांच्याशी चर्चा करून संबधीत निवेदन माहितीसाठी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे साहेब यांच्याकडे सोपवले त्यावेळी तेथे ॲड. सूरज जाधव व इतर मन सैनिक उपस्थित होते.