क्रीडा प्रबोधिनीची एफसीआयवर मात

पुणे, जुलै: क्रीडा प्रबोधिनी ’अ’ आणि जीएसटी कस्टम्स, पुणे संघांनी सातत्य राखताना हॉकी पुणे लीगमध्ये विजय नोंदवले. दुसरीकडे, हॉकी लव्हर्स अकॅडमीने वरिष्ठ विभागीय सामन्यात किड्स हॉकी अकॅडमीवर 18-2 असा मोठ्या फरकाने मात केली.

हॉकी महाराष्ट्रच्या मान्यतेने मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या हॉकी पुणे लीगमध्ये शनिवारी वरिष्ठ विभागात क्रीडा प्रबोधिनी ‘अ’ संघाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे यांच्यावर 2-1 असा चुरशीचा विजय मिळवला. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. रोहन पाटीलने (23वे आणि 42वे) पेनल्टी कॉर्नरवर केलेले दोन गोल क्रीडा प्रबोधिनीला दुसर्‍यांदा पूर्ण गुण मिळवून देण्यास पुरेसे ठरले. एफसीआयकडून एकमेव गोल श्री किशनने (37व्या) पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला.

तत्पूर्वी, शुक्रवारी झालेल्या सामन्यांत जीएसटी अँड कस्टम्स, पुणे संघाने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे संघाचा  7-4 असा पराभव केला.

त्यांच्या विजयात मोझेस अलेक्झांडरचे दोन (11वा, 51वा), तालेब शाह (19वा, 21वा, 26वा-पीसी, 33वा-पीसी) हॅटट्रिक आणि फेलिक्स बा याचा (58वा) एक गोल महत्त्वपूर्ण ठरला. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पुणेसाठी (एफसीआय) मनप्रीत सिंग (7वे, 20वे-पीसी), राज पाटील (50वे-पीसी) आणि श्री किशनने (60वे-पीसी) गोल केले.

निकाल –

वरिष्ठ विभाग
जीएसटी अँड कस्टम्स, पुणे: 7(मोझेस अलेक्झांडर 11वा, 51वा; तालेब शाह 19वा, 21वा,, 26वा-पीसी, 33वा-पीसी; फेलिक्स बा 58वा) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे: 4(मनप्रीत सिंग 7वा, 20वा-पीसी; राज पाटील 50वे-पीसी; श्री किशन 60वे-पीसी) हाफटाईम: 4-2

क्रीडा प्रबोधिनी ‘अ’: 2(रोहन पाटील 23वे-पीसी, 42वे-पीसी) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), पुणे: 1 (श्री किशन 37वे-पीएस). हाफटाईम: 1-0

कनिष्ठ विभाग

अ गट: हॉकी लव्हर्स अकॅडमी: 18(गौरव कांबळे 4 था-पीसी, 35वा-पीसी; समीर शेख 6वा, 13वा, 50वा; इफाज शेख 7वा, 15वा, 20वा; आकाश खैरे 9वा; इंदल सूर्यवंशी 23वा, 46वा, 49वा, 58वा; साहिल सकपाळ 24वा, 53वा; ओमकार मोघे 25वा, 28वा; अमित राजपूत 29वा) विजयी वि. किड्स हॉकी अकादमी: 2 (ओम दांगट 8वा; हर्षवर्धन खुणे 37वा).