योकोगावा तर्फे ॲडेप्ट फ्ल्युडाईन या भारतीय फ्लोमीटर उत्पादकाचे संपादन

पुणे, मे 2024 : भारतातील सर्वांत मोठ्या मॅग्नेटिक फ्लोमीटर्स उत्पादकांपैकी एक असलेल्या ॲडेप्ट फ्ल्युडाईन प्रा.लि.चे संपादन योकोगावा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जपान ने पूर्ण केल्याची घोषणा योकोगावा इंडिया लि. तर्फे करण्यात आली आहे. याप्रसंगी योकोगावा इलेक्ट्रिक-जपान चे उपाध्यक्ष आणि योकोगावा इंडिया लि.च्या दक्षिण आशियाई क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सजिव नाथ आणि ॲडेप्ट फ्ल्युडाईन प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक विनायक गद्रे उपस्थित होते.

योकोगावा ने 1987 मध्ये स्थानिक उपकंपनी स्थापित केली असून उर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी कंट्रोल सिस्टिम्स व फिल्ड इन्ट्रुमेंटस,भारताच्या नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्ट अंतर्गत पाणी पुरवठा आणि सांडपाणी नेटवर्क्सचे रिमोट मॉनिटरींग आणि पाणी प्रक्रिया सुविधांसाठी कंट्रोल सिस्टिम्स प्रदान करत आली आहे. योकोगावा कडे सिस्टिम्स इंजिनिअरींग टीम्स असून कंपनीच्या जागतिक कामकाजाला साहाय्य करण्यासाठी संशोधन व विकास केंद्र देखील आहे. योकोगावा ने आघाडीच्या पाणी व सांडपाणी प्रक्रिया,तेल व गॅस,रसायन व पेट्रोकेमिकल,खत उत्पादक,औषध निर्माण व लाईफ सायन्सेस,मेटल व मायनिंग,उर्जा,खाद्य व पेय व इतर क्षेत्रातील कंपन्यांच्या कामकाजामध्ये साहाय्य केले आहे.

फ्लोमीटर हे एक आवश्यक औद्योगिक साधन असून प्रवाह दर आणि काही उत्पादनांमध्ये घनता व द्रव,वायू आणि वाफेचे तापमान मोजू शकते.मोजमापाचा उद्देश्य,द्रव किंवा वायूचा प्रकार आणि मापन स्थिती यावर अवलंबून विविध मापन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे.ज्याचा उद्देश्य भारताला एक जागतिक उत्पादन केंद्रात रूपांतरित करणे हा आहे. यासाठी बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्मिती देशांतर्गत करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.त्यामुळे फ्लोमीटर्सची मागणी ही वाढत आहे.अद्ययावत उत्पादन पध्दतींचा अवलंब केल्यामुळे या वाढीला अधिक चालना मिळत असून विविध उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियांची कार्यक्षमता वाढत आहे.

पुढे जाऊन योकागावाचे उद्दिष्ट हे ॲडेप्टच्या पुण्यातील उत्पादन क्षमता व प्रमाणित फ्लोकॅलिब्रेशन सुविधा वाढविण्याचे असून जागतिक गुणवत्ता मापदंडांशी सुसंगत मॅग्नेटिक फ्लोमीटर्सचे स्थानिक उत्पादन करणे हे आहे. योकोगावा तर्फे दोन्ही कंपन्यांच्या विक्री जाळ्यांमार्फत ॲडेप्टच्या फ्लोमीटर्सची श्रेणी यापुढेही प्रदान केली जाईल.

योकोगावा इलेक्ट्रिक-जपान चे उपाध्यक्ष आणि योकोगावा इंडिया लि.च्या दक्षिण आशियाई क्षेत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सजिव नाथ   म्हणाले की,मेक इन इंडियावर आमचा ठाम विश्वास असून आम्ही भारतीय बाजारपेठेसाठी वचनबध्द आहोत. भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील शाश्वत परिवर्तन व विकासाचा भाग बनणे हे आनंददायी आहे.आम्ही सर्वोत्कृष्ट भारतीय कौशल्ये,जपानी गुणवत्ता आणि उत्कृष्ट कल्पकता एकत्रित करून मेक इन इंडियाच्या अंतर्गत अभिनवता आणि विकासाच्या प्रवासाला सुरूवात करत आहोत.

ॲडेप्ट फ्ल्युडाईन प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक विनायक गद्रे म्हणाले की,योकागावा कुटुंबाचा भाग बनणे ही ॲडेप्टसाठी एक आनंददायी बाब आहे.1983 मध्ये स्थापित ॲडेप्टने गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मॅग्नेटिक फ्लोमीटर्सची निर्मिती केली असून 2010 मध्ये अल्ट्रासोनिक फ्लोमीटर्स बाजारात आणले. आम्ही पाणी आणि सांडपाण्यासह उद्योगातील अनेक क्षेत्रांना 70,000 हून अधिक फ्लोमीटर्स पुरविले आहेत. याशिवाय ॲडेप्ट तर्फे आयओटी गेटवेज्‌‍,स्मार्ट वॉटर मीटर्स आणि फ्लोमीटर कॅलिब्रेशन सेवा पुरविल्या जातात. भारतभर विस्तारित होणाऱ्या विक्री नेटवर्कसह ॲडेप्ट ने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण ऑर्डर्स आजवर मिळविल्या आहेत व 25 हून अधिक देशांमध्ये आपल्या उत्पादनांची निर्यात करत आहे.