राष्ट्रीय, जून, २०२४: भारतातील सर्वात मोठ्या एकीकृत वीज कंपन्यांपैकी एक आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांना चार्जिंग सेवा पुरवणारी कंपनी टाटा पॉवरने प्रमुख महानगर भागांमध्ये ८५० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स तैनात करून देशामध्ये ई-मोबिलिटीच्या दिशेने सुरु असलेल्या परिवर्तनाचे नेतृत्व करणे सुरु ठेवले आहे.
दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगलोर, जम्मू, श्रीनगर, धारवाड, लखनौ आणि गोवा यासारख्या प्रमुख शहरांमध्ये ३० पेक्षा जास्त बस डेपोंमध्ये चार्जिंग पॉईंट्स लावण्यात आले आहेत. टाटा पॉवरने देशभरातील २३०० पेक्षा जास्त सार्वजनिक ई-बसेसना सक्षम केले आहे. या प्रचंड मोठ्या चार्जिंग नेटवर्कमुळे १ लाख टनांपेक्षा जास्त टेलपाईप कार्बन डाय ऑक्साईड चे उत्सर्जन रोखले जात आहे. टाटा पॉवरने देशभरामध्ये विविध बस डेपो डिझाईन व तयार केले आहेत.
टाटा पॉवरच्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १८० ते २४० किलोवॅट रेन्जमधील उच्च क्षमतेचे वेगवान चार्जर्स आहेत, जे सरासरी १ ते १.५ तासांमध्ये चार्जिंग करू शकतात. वेगवान चार्जिंग क्षमतांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या बसेसच्या संचालनविषयक गरजा पूर्ण होण्यात मदत मिळते.
टाटा पॉवरचे सर्वात जास्त ईव्ही चार्जिंग पॉईंट्स दिल्लीमध्ये आहेत, त्यापाठोपाठ मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, जम्मू आणि श्रीनगरमध्ये कंपनीने ईव्ही चार्जिंग पॉईंट्स बसवले आहेत. ई-मोबिलिटीचा स्वीकार केला जावा यासाठी प्रोत्साहन देण्यात टाटा पॉवर आघाडीवर आहे. विविध ओईएम ऑपरेटर्ससोबत हातमिळवणी करून आणि विविध राज्य सरकारांच्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन्सना सेवासुविधा पुरवून वेगाने आगेकूच करत आहे.
चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासासाठी टाटा पॉवरने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सेवासुविधा पुरवल्या आहेत, ग्राहकांना सर्वोत्तम चार्जिंग अनुभव मिळेल याची काळजी घेतली आहे, कामे वेळेत पूर्ण करून ग्राहकांना सर्वसमावेशक ऑपरेशन आणि मेन्टेनन्स सेवा पुरवण्यावर भर दिला आहे. व्यवसायाचे सर्व कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्र तसेच नियामक ना हरकत मंजुऱ्या पुरवण्यासारख्या सेवा देखील टाटा पॉवर देते.
भारताच्या नेट झिरो उद्दिष्टांना अनुसरून, टाटा पॉवर २०४० पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बांधील आहे. देशामध्ये सुरु असलेल्या हरित ऊर्जा परिवर्तनामधील आघाडीची कंपनी म्हणून टाटा पॉवरने हरित ऊर्जा उपाययोजनांची सर्वसमावेशक श्रेणी प्रस्तुत केली आहे, यामध्ये रुफटॉप सोलर, होम ऑटोमेशन, स्मार्ट मीटरिंग आणि ईव्ही चार्जिंग यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सस्टेनेबल जीवनशैली स्वीकारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी देखील टाटा पॉवर प्रयत्नशील आहे. ‘सस्टेनेबल इज अटेनेबल’ या टाटा पॉवरच्या अभियानामुळे ही बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. या अभियानामध्ये हरित ऊर्जा उपाययोजना स्वीकारण्यास प्रोत्साहन देण्याचे तसेच सस्टेनेबिलिटीचे रूपांतर जनमोहिमेमध्ये करण्याचे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे.