ॲल्स्टॉम या स्मार्ट आणि शाश्वत मोबिलिटी क्षेत्रातील जगभरांतील आघाडीच्या कंपनी ने आज पुणे मेट्रो लाईन ३ साठी यशस्वी रित्या त्यांच्या पहिल्या मेट्रोपॉलिस मेट्रो ट्रेनचे यशस्वी वितरण केल्याची घोषणा केली, या मेट्रोपॉलिस ट्रेनचे उत्पादन हे श्रीसिटी (आंध्रप्रदेश) येथील कंपनीच्या उत्पादन केंद्रात करण्यात आले आहे. या १०० टक्के भारतीय बनावटीच्या ट्रेन्स असून या गाड्या अधिकतर ८५ किमी प्रती तास या वेगाने धावू शकतील, तर याचे डिझाईन ९५ किमी प्रती तास या गतीनुसार करण्यात आले आहे. या गाड्यांमुळे आता महाराष्ट्रातील दुसर्या सर्वात मोठ्या शहरातील हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगरच्या महत्त्वपूर्ण व्यापारी भागाला जोडणे शक्य होणार आहे.
हस्तांतरण कार्यक्रमात बोलतांना अल्स्टॉम इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक ऑलिव्हर लॉयसन यांनी सांगितले “ टाटा ग्रुप च्या प्रतिशय अशा प्रकल्पामध्ये योगदान देतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. आंम्हाला खात्री आहे की स्थानिक पातळीवरील तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रोपॉलिस मेट्रो ट्रेन्स या नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भुमिका बजावतील आणि त्याच बरोबर शहराच्या विकासातही योगदान देतील. अल्स्टॉम मध्ये आम्ही नेहमीच शाश्वत उत्पादने आणि उपाय देण्यावर लक्ष केंद्रित करत असतो ज्यामुळे पुढील अनेक दशकात काम करुन काळाच्या कसोटीवर या गाड्या खर्या उतरतील.”
पुणे मेट्रोलाईन ३ हा अंदाजे २३ किमी लांबीचा एलिव्हेटेड मेट्रो रेल प्रकल्प असून तो पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी ला पुण्यातील प्रमुख व्यावसायिक जागा असलेल्या शिवाजीनगरला जोडतो. कामाची सुरुवात ही टाटा ग्रुप आणि पीएमआरडीए तर्फे खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्वावर करण्यात आले आहे. टाटा ग्रुप ने स्थानिक अशा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड ही स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करुन त्यांच्याकडून २३ स्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहे.
२०२१ मध्ये अल्स्टॉम इंडिया, टीआरआयएल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टाटा ग्रुपची कंपनी) आणि सिमेन्स प्रोजेक्ट्स व्हेंचर्स जीएमबीएच (सिमेन्स फायनान्शियल सर्व्हिसेस) यांच्या सहकार्याने सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी (पीपीपी) च्या मार्गाने कंत्राट हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले होते. यामध्ये त्यांना रोलिंग स्टॉक, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सिस्टमचे काम एलिव्हेटेड मेट्रो लाईन करता द्यायचे होते. या विशेष रुपाने तयार करण्यात आलेल्या कंपनीचे नाव पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड असून कंपनीची स्थापना ही २३ स्टेशन्सची कॉरिडॉर तयार करुन द्यायची आहेत, नवीन मेट्रो पॉलिसी अंतर्गत देशातील अशी ही पहिली मेट्रो आहे. या प्रकल्पाचा विकास आणि परिचालन हे डिझाईन, बिल्ड फायनान्स, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर (बीडीएफओटी) तत्वावर केली जात आहे.