हाऊस ऑफ अभिनंदन लोढा तर्फे दुबई फ्रेमवर वैभवशाली अयोध्येची प्रतिमा प्रदर्शित 

पुणे ३ जून २०२४: दुबई, न्यूयॉर्क आणि दिल्ली  सारख्या जगभरातील गजबजलेल्या भागात मोठमोठे समारंभ करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा   ने अयोध्येत सामावलेली प्रचंड क्षमता दाखवून दिली आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या अयोध्येच्या उज्ज्वल, आशावादी भविष्यात जागतिक सहभागास आमंत्रण दिले. जगभरातील भारतीयांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित करून या समारंभांनी जागतिक आध्यात्मिक राजधानी म्हणून अयोध्येचे स्थान आणखी मजबूत केले.ही जागतिक चळवळ अयोध्येला जागतिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेस अनुरूप आहे. मोठमोठ्या स्थळी अयोध्येच्या समृद्ध परंपरेचा प्रसार करून हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ने या शहराची लक्षणीयता आणि तेथील विकासाची क्षमता अधोरेखित केली.

नुकतेच प्रभू श्रीरामांची पावन जन्मभूमी असलेल्या अयोध्येची वैभवशाली प्रतिमेच दुबई फ्रेम या जगातील सर्वात मोठ्या, १५० मीटर उंच फ्रेमवर एक आकर्षक देखावा सामील आहे. दुबई फ्रेम हे दुबईमधील एक अत्यंत प्रसिद्ध शिल्प आहे आणि भूतकाळ आणि वर्तमानातील सेतूचे ते प्रतीक आहे. त्यामुळे अयोध्येच्या परंपरेचा गौरव करण्यासाठी हे स्थान उचित होते. दुसरीकडे, न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये एक आकर्षक व्हिडिओ डिस्प्ले आणि ऑन-ग्राउंड अॅक्टिव्हेशनद्वारे भविष्याची नांदी देत अयोध्येचा वारसा न्यूयॉर्क शहराच्या थेट मध्यात आणला आणि अयोध्येचे वैभव जगभरातील लोकांना दाखवले 

द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे अध्यक्ष डॉ. अभिनंदन लोढा म्हणाले, “जागतिक मंचावर अयोध्याजींचे वैभव प्रदर्शित करण्याची संधी आम्हाला मिळाली, हा आमचा गौरव आहे. मोठमोठ्या जागतिक शिल्पांजवळ अयोध्याजींचा वारसा आणि आध्यात्मिक लक्षणीयता प्रदर्शित करून आम्ही जगभरातील भारतीयांना त्यांच्या मुळांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. या जागतिक प्रदर्शनातून देशविदेशातील भारतीयांना अयोध्येत जमीन खरेदी करण्याची आणखी एक संधी आम्ही देत आहोत, आम्ही जगभरातील भारतीयांना अयोध्या येथे जमिनीत गुंतवणूक करून आपल्या भूतकाळाचा गौरव करणारा आणि भविष्याची उभारणी करणारा वारसा निर्माण करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. जागतिक आध्यात्मिक राजधानी म्हणून अयोध्येला यथोचित सन्मान मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे आणि आज त्या दिशेने आम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.”

हा उपक्रम म्हणजे अयोध्येच्या परिवर्तनात आणि पुनर्जागरणातहाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे एक छोटेसे योगदान आहे. हाऊस ऑफ अभिनंदन लोढा एक वारसा निर्माण करण्यासाठी आणि या गोष्टीची खातरजमा करण्यासाठी कटिबद्ध आहे की, एक जागतिक आध्यात्मिक राजधानी म्हणून अयोध्येचा गौरव वाढेल आणि तो जतन करण्यात येईल.