पीआयएफएए ही गुंतवणुकीच्या जगतातील म्युच्युअल फंड वितरकांची (एमएफडी) देशातील सर्वात प्रसिद्ध संघटनांपैकी एक आहे. गुंतवणूकदार आणि एमएफडी यांना बळकटी आणण्यासाठी त्यांचे उपक्रम आदर्श ठरले असून उद्योगात त्यांना चांगली मान्यता मिळाली आहे. एमएफडींचे कौशल्य आणि तांत्रिक विकास वाढविण्यासाठी त्यांनी एक दशकापेक्षा अधिक काळ समर्पित वृत्तीनेपुणे, जून २०२४: पुणे इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल अॅम्बॅसडर्स असोसिएशन, जी पीआयएफएए या नावाने ओळखली जाते, या संघटनेने लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आपल्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यांच्या ‘स्ट्राईव्हिंग सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे आगळे वैशिष्ट्य ठरले. कार्य केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या आर्थिक बाबतीत अधिक सर्वसमावेशक संवाद आणि मार्गदर्शन मिळाले आहे.
स्ट्राईव्हिंग सक्सेस स्टोरीज’ या पुस्तकात या संघटनेच्या अनेक सदस्यांच्या या क्षेत्रातील प्रवासाची कथा वर्णन केली आहे. त्यांच्या या प्रवासाचे चिंतन करणारे हे पुस्तक भविष्यातील आर्थिक सल्लागारांसाठी दीपस्तंभाचे काम करणार आहे कारण यात या अनुभवी सदस्यांनी आपले ज्ञान वाचकांसमोर मांडले आहे. अनेक प्रतिकूलतांवर मात करून आपल्या सल्लागार आणि वितरण व्यवसायात यशाचे शिखर गाठणाऱ्या या सदस्यांच्या सत्यकथांनी हे पुस्तक सजले आहे.
कार्यक्रमात बोलताना निमेश शाह यांनी या उदयोगाची अंतर्गत माहिती दिली. तसेच गुंतवणुकीचे एक उत्पादन म्हणून म्युच्युअल फंडांची लोकप्रियता जनसामान्यांमध्ये वाढविण्याकरिता पीआयएफएएच्या असाधारण प्रयत्नांना दाद दिली. शाह पुढे म्हणाले, “गुंतवणूक व्यवस्थापन असो किंवा सल्लागाराचे काम असो, समाधानी ग्राहकांची निर्मिती करणे हा आपल्या कामातून मिळणार खरा आनंद आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे आणि राष्ट्राची वाढ होत असताना गुंतवणूकदारांसाठी संधीही वाढत आहेत.”
टिकून राहण्यासाठी वाढ अत्यावश्यक आहे, हे अधोरेखित करताना भारतीय बाजारपेठेत प्रचंड क्षमता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोंडीत सापडणे टाळण्यासाठी व्यवसायांनी सातत्याने वाढीचा प्रयत्न करायला हवे आणि ही वाढ साध्य करण्यासाठी ग्राहकांना डिजिटल माध्यमातून जवळ आणणे हे अत्यंत परिणामकारक आहे, असेही ते म्हणाले. यशाची गुरुकिल्ली अधोरेखित करताना ते म्हणाले, “परिणामकारक जोखीम व्यवस्थापन, सतत वाढ आणि ग्राहकांचा विश्वास कायम टिकवून ठेवणे हे यश मिळविण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात.”
कार्यक्रमात बोलताना पीआयएफएएचे एक संस्थापक सदस्य श्री. सुहास अकोले म्हणाले, “सर्व सन्माननीयांचे अभिनंदन. तुमच्या कामगिरीचा पीआयएफएएला अभिमान वाटतो आणि तुमच्या यशापासून इतर अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा वाटते. या पुस्तकाच्या माध्यमातून पुण्यातील एमएफडी समुदायातील अग्रगण्य सदस्यांच्या कहाण्या समोर आणताना आम्हाला आनंद वाटतो. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या सहयोगामुळे त्या शक्य झाल्या आहेत. या प्रकाशनाच्या प्रवासात त्यांच्या पाठिंबा व आधाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.”
या पुस्तकाच्या निर्मितीची कथा सांगताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे रिजनल हेड (आरओएमजी) श्री. गौरव जाजू यांनी पीआयएफएएच्या सदस्यांशी सहयोग करणे हा आपला सन्मान असल्याचे सांगितले. म्युच्युअल फंड उद्योगाच्या उत्क्रांतीमध्ये यातील अनेक सदस्यांनी कळीची भूमिका निभावल्याचे त्यांनी दिलखुलासपणे सांगितले. या पुस्तकात आलेल्या त्यांच्या कहाण्या भविष्यातील सदस्यांसाठी या उद्योगाच्या समृद्ध इतिहासाची जपणूक करून ती समोर आणण्याच्या पीआयएफएएच्या निष्ठेचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.