नानासाहेब पाटणकर यांचे निधन

पुणे : प्रगतशील शेतकरी, भवानी सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब शंकरराव पाटणकर (७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सूना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर व उद्योजक पंकज पाटणकर यांचे ते वडील होत. प्राचीन संहिता गुरुकुल, कायाआयुर्वेद या संस्थांचे ते संचालक होते. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.