‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे पुण्यातील शिवाजीनगर येथे ‘लाइटस्टाइल’ दालनाचे उदघाटन

पुणे, जून २०२४: आपली परंपरा आणि दागिन्यांच्या उत्कृष्टतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे जेएम रोड, शिवाजीनगर, पुणे येथे ‘लाइटस्टाइल’ हे नवीन भव्य दालन सुरू करण्यात आले आहे. ५०० चौरस फूट जागेत विस्तारलेल्या या दालनात कमी वजनाच्या सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे. हे भव्य दालन म्हणजे ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दुसऱ्या लाइटस्टाइल ज्वेलरी दालनासह लाइटवेट लाइफस्टाइल ज्वेलरीमध्ये ब्रँडचा विस्तार वाढत असल्याचे प्रतीक आहे.

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपले योगदान देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत दालनाचे भव्य उदघाटन झाले.

‘पीएनजी ज्वेलर्स’ची लाइटस्टाइल ब्रँड श्रेणी असून आजच्या सक्षम महिलांसाठी अत्यंत समर्पणाने डिझाइन केलेली आहे. हा ब्रँड ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या विश्वासाचा वारसा पुढे नेत असून विशेषत: २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट मधील कमी वजनाच्या सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित करतो. हा ब्रँड विश्वासार्हता या शब्दाचे प्रतीक असून आधुनिक काळातील महिलांचा विचार करता त्यांचा दैनंदिन जीवनात सहजपणे वापरता यावे, यासाठी उत्कृष्ट दागिन्यांची श्रेणी सादर केली आहे.

जेएम रोड, शिवाजीनगर स्थित नवीन लाइटस्टाइल दालनामध्ये कमी वजनाच्या दागिन्यांची उत्कृष्ट आणि वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध करण्यात आली आहे. लाइटस्टाइल दालनामध्ये क्लिष्ट डिझाइन असलेल्या सोन्याच्या दागिन्यांपासून ते चमकदार नैसर्गिक हिऱ्याच्या दागिन्यांपर्यंत, कानातले, पेंडंट सेट, चेन सेट, नेकलेस आणि ब्रेसलेट यांसारख्या उत्पादनांच्या श्रेणींचा समावेश आहे.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, लाइटस्टाइल बाय पीएनजी ज्वेलर्स दालनाचे उदघाटन म्हणजे हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या श्रेणीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नोकरी व व्यवसाय करणाऱ्या महिलांना दैनंदिन कामकाजामध्ये दागिन्यांचा वापर सहजपणे करता यावा या उद्देशाने कमी वजनाचे उत्कृष्ट दागिने घडविण्यात आले आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाल्या की,लाइटस्टाइलच्या प्रत्येक दागिन्यात शैली आणि परिपूर्णता या दोन्हीचा संगम आहे. पीएनजीच्या परंपरेत ही विलक्षण भर पडल्याबद्दल मी पीएनजी परिवाराचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन करते.

या नवीन दालनाचा भाग म्हणून लाइटस्टाइल बाय पीएनजी ज्वेलर्स आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना घेऊन आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना दागिन्यांच्या घडणावळीवर २५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे.