सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत.
मुंबई: देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे (Lok Sabha Election 2024) सातव्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. हे मतदान संपत असताना सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची (Exit Poll 2024) आकडेवारी जाहीर होत आहे. यापैकी ABP-CVoter या देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह एक्झिट पोलकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एबीपी-सी व्होटरच्या आजच्या एक्झिट पोलमध्ये टप्याटप्प्याने प्रत्येक राज्याचा निकाल जाहीर केला जाईल. शेवटच्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या राज्यांना वगळून अन्य राज्यांमधील ABP-CVoter च्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जातील.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षांनी किती जागा लढल्या?
राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानापूर्वी एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये महाविकास आघाडीला 18 तर महायुतीला 30 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.
महायुती
- भाजप – 28
- एकनाथ शिंदे – 15
- अजित पवार – 4
- महादेव जानकर – 1
महाविकास आघाडी
- उद्धव ठाकरे गट – 21
- काँग्रेस – 17
- शरद पवार – 10
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार?
- मविआ- 23 ते 25
- महायुती – 22 ते 26
गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, आता आकडा 26 जागांपर्यंत खाली आल्यास हा भाजपप्रणित NDA आघाडीसाठी मोठा धक्का ठरेल. या 26 जागांमध्ये भाजपचे किती उमेदवार असणार, हे पाहावे लागेल. यापैकी बहुतांश उमेदवार भाजपचे असल्यास शिंदे गट आणि अजित पवार गटामुळे फारसा फायदा झाला नसल्याचे स्पष्ट होईल.
मविआ आणि महायुतीमध्ये रस्सीखेच
एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात दिसली रस्सीखेच. महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज. महायुतीला २४ तर मविआला 23 जागांचा अंदाज. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य. मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज. शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज.
महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य. 2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणाला किती यश मिळणार?
महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. यानंतर शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला होता. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठे यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
एबीपी माझा-सी व्होटरच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपने लढवलेल्या एकूण 28 जागांपैकी 16 ते 18 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
याउलट राज्यात काँग्रेसला 7 ते 9 जागांवर विजय मिळू शकतो. तर शरद पवार गट आणि ठाकरे गटाला 15 ते 17 जागांवर विजय मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.
पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला किती जागा?
केंद्रात पुन्हा सरकार आणण्याच्यादृष्टीने भाजपला पाच प्रमुख राज्यांमध्ये किती जागा मिळतात, याकडे अनेकांचे लक्ष होते. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश होता. एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणित 22 ते 26 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर कर्नाटकमध्ये एनडीए आघाडीला 23 ते 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 21 ते 23 सीट मिळण्याचा अंदाज आहे.
दक्षिणेत भाजपला मोठं यश
दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपला मोठं यश. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपला मोठं यश मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज. कर्नाटकमध्येही भाजपचा वरचष्मा राहणार. तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजप खातं उघडणार. एबीपी-सी व्होटरच्या अंदाजानुसार, कर्नाटकमध्ये एनडीएला 23 ते 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता. इंडिया आघाडीला 3 ते 5 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज.
* आंध्रप्रदेशमध्ये एनडीएला 21 ते 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता, इंडिया आघाडीला शून्य जागा.
* तेलंगणात एनडीला 7 ते 9 जागा, तर इंडिया आघाडीला 7-9 जागा.
* तामिळनाडूत एनडीएला 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता. इंडिया आघाडीला 37 ते 39 जागांवर विजय मिळण्याची शक्यता.
* केरळमध्ये एनडीएला 1 ते 3 जागांवर विजय, इंडिया आघाडीला 17 ते 19 जागांवर विजय मिळण्याची शक्यता.
कोणत्या राज्यात कोणाला किती जागा मिळणार?
राज्य | इंडिया आघाडी | एनडीए आघाडी | इतर | एकूण |
अंदमान निकोबार | 0 | 1 | 1 | |
आंध्र प्रदेश | 0 | 21 ते 25 | 0 ते 4 | 25 |
अरुणाचल प्रदेश | 0 | 2 | 0 | 2 |
आसाम | 2 ते 4 | 10 ते 12 | 0 | 14 |
छत्तीसगढ | 0 ते 1 | 10 ते 12 | 0 | 11 |
दादरा नगर हवेली | 0 | 1 | 0 | 1 |
दमण-दीव | 0 | 1 | 0 | 1 |
दिल्ली | 1 ते 3 | 4-6 | 0 | 7 |
गोवा | 1 | 1 ते 2 | 0 | 2 |
गुजरात | 1 | 25 ते 26 | 0 | 26 |
हरियाणा | 4 ते 6 | 4 ते 6 | 0 | 10 |
जम्मू काश्मीर | 0 ते 2 | 1 ते 2 | 2 ते 3 | 5 |
कर्नाटक | 3-5 | 23-25 | 0 | 28 |
केरळ | 17-19 | 1-3 | 0 | 20 |
लडाख | 0-1 | 0 | 0 | 1 |
लक्षद्वीप | 0-1 | 0 | 0 | 1 |
मध्य प्रदेश | 1-3 | 26-28 | 0 | 29 |
महाराष्ट्र | 23-25 | 22-26 | 0 | 48 |
मणिपूर | 1 | 1-2 | 0 | 2 |
मेघालय | 1 | 1-2 | 0 | 2 |
मिझोराम | 0 | 1 | 1 | 1 |
नागालँड | 1 | 1 | 0 | 1 |
पुदुच्चेरी | 1 | 0 | 0 | 1 |
राजस्थान | 2-4 | 21-23 | 0 | 25 |
सिक्कीम | 0 | 1 | 0 | 1 |
तामिळनाडू | 37-39 | 0-2 | 0 | 39 |
तेलंगणा | 7-9 | 7-9 | 0-1 | 17 |
त्रिपुरा | 0 | 2 | 0 | 2 |
उत्तराखंड | 0 | 4-5 | 0 | 5 |