मारुतीने या कारला केले टॅक्स फ्री! या खास ग्राहकांना एक लाख रुपयांनी स्वस्त मिळणार ही गाडी; जाणून घ्या डिटेल्स

मारुती सुझुकी वॅगनआर

कंपनीने मारुती सुझुकी वॅगनआरवरील GST लक्षणीयरीत्या कमी केला आहे. मात्र ही सुविधा काही खास ग्राहकांनाच दिली जात आहे. कार उत्पादक कंपनीने कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट (CSD) कडून कार खरेदीदारांना सुविधा दिली आहे. या स्टोअर्समधून अनेक गाड्या विकल्या जातात, ज्या फक्त लष्कराचे जवानच खरेदी करू शकतात. CSD द्वारे विकल्या जाणाऱ्या कारवर 28 टक्क्यांऐवजी केवळ 14 टक्के कर आकारला जातो.

CSD वरून खरेदी केल्यावर लाखोंचा नफा

मारुती सुझुकी वॅगनआरची एक्स-शोरूम किंमत 5,54,500 रुपयांपासून सुरू होते. तर CSD वरून खरेदी करणाऱ्यांसाठी या कारची किंमत 4,63,165 रुपयांपासून सुरू होते. एक्स-शोरूम किंमत आणि CSD किंमत यामध्ये 91,335 रुपयांचा फरक आहे.

तर WagonR च्या इतर व्हेरिएंटमध्ये हा फरक एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. जर आपण मारुती सुझुकी वॅगनआरच्या 1.0-लीटर पेट्रोल एएमटी प्रकाराबद्दल बोललो तर WagonR VXI ची एक्स-शोरूम किंमत 6,49,500 रुपये आहे. पण या कारची CSD किंमत 5,42,080 रुपये आहे. या दोन्ही किमतींमध्ये 1,07,420 रुपयांचा फरक आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर परफॉर्मेंस

मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये प्रगत K-सिरीज इंजिन आहे. मारुतीची ही कार 1.0-लिटर पेट्रोल MT व्हेरिएंटमध्ये 24.35 kmpl चा मायलेज देते. तर 1.0-लिटर पेट्रोल AGS व्हेरिएंट 25.19 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. याशिवाय, ही कार 1-लिटर CNG प्रकारात 33.47km/kg मायलेज देते.

मारुती कारची फीचर्स

मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये ऑटो गियर शिफ्टची सुविधा देण्यात आली आहे. या कारमध्ये स्मार्टप्ले स्टुडिओसह स्मार्टफोन नेव्हिगेशनची सुविधाही देण्यात आली आहे. या कारमध्ये स्मार्टप्ले डॉक सिस्टीम देखील स्थापित केली आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे फोन कॉल्स, संगीत आणि नेव्हिगेशन सिस्टीमशी जोडलेले राहता.