राष्ट्रीय, जून 2024: डी डेव्हलपमेंट इंजिनिअर्स लिमिटेड (“डी पायपिंग” किंवा “द कंपनी”) ची इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीशी संबंधित बोली/ऑफर बुधवार 19 जून 2024 पासून सुरू होत आहे.
प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या एकूण ऑफर साईज मध्ये 3,250 दशलक्ष रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू (“फ्रेश इश्यू”) आणि 45,82,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे (“ऑफर फॉर सेल”).
या ऑफर मध्ये पात्र कर्मचाऱ्यांकडून सबस्क्रीब्शन साठी 10.00 दशलक्ष रु. (1 कोटी रु.) पर्यंतचे आरक्षण समाविष्ट आहे. (“कर्मचारी आरक्षण भाग”)
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख मंगळवार 18 जून 2024 असेल. बोली/ऑफर बुधवार 19 जून 2024 रोजी सबस्क्रीब्शन साठी खुली होईल आणि शुक्रवार 21 जून 2024 रोजी (“बीड डिटेल्स”) बंद होईल.
प्रति इक्विटी शेअरसाठी 193 रुपये ते 203 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 73 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 73 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यू मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर (i) आर्थिक वर्ष 2025 मध्ये साधारण 750 दशलक्ष रु. पर्यंत आमच्या कंपनीच्या खेळत्या भांडवली गरजांच्या निधीसाठी (ii) आर्थिक वर्ष 2025 मध्ये साधारण 1,750 दशलक्ष रु. पर्यंत आमच्या कंपनीने घेतलेल्या कर्जाच्या संपूर्ण किंवा काही भागाच्या प्रीपेमेंट वा रीपेमेंट साठी आणि उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरण्यात येणार आहे.
ऑफर फॉर सेल मध्ये कृष्ण ललित बन्सल यांच्या तर्फे 45,82,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट असलेले 45,82,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (“ऑफर्ड शेअर्स”) (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) आहेत आणि ही विक्री समभागधारक यांच्या तर्फे इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल म्हणजे “द ऑफर फॉर सेल” आहे.
इक्विटी शेअर्स 11 जून 2024 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे नवी दिल्ली येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, नॅशनल कॅपिटल टेरीटरी ऑफ दिल्ली अँड हरयाणा सह सादर केले जात आहेत.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे सादर केले जात असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE सोबत एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफर साठी एनएसई हे नियोजित स्टॉक एक्स्चेंज आहे. (“लिस्टिंग डिटेल्स”)
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स 1957 च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून).
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) वाटपामध्ये जोडले जातील.
तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी अ) एक तृतीयांश भाग 0.20 दशलक्ष रु. पेक्षा जास्त आणि 1.00 दशलक्ष रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि ब) दोन तृतीयांश भाग 1.00 दशलक्ष रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो.
ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग आणि ऑफर प्राइस पेक्षा जास्त बोली असेल तर रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफरच्या किमतीवर किंवा त्याहून अधिक मान्यताप्राप्त बोली साठी हे लागू असेल.
पुढे, कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणार्या पात्र कर्मचार्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या वैध बोलींच्या अधीन किंवा ऑफर किमतीच्या वर इक्विटी समभागांचे वाटप प्रमाणानुसार केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, पृष्ठ 451 वरील “ऑफर प्रक्रिया” पहा.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि इक्वीरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइझ संज्ञांचा समान अर्थ RHP मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणेच असेल.