दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए नीलेश केकाण यांची निवड

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी सीएमए नीलेश केकाण यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष सीएमए नागेश भागणे यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सचिवपदी सीएमए राहुल चिंचोळकर, तर खजिनदारपदी सीएमए हिमांशू दवे यांची निवड झाली आहे.
२०२४-२५ या वर्षाकरिता नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सीएमए नागेश भागणे, सीएमए अमेय टिकले, सीएमए तनुजा मंत्रवादी, सीएमए अनुजा दाभाडे आणि सीएमए निखिल अगरवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांचा समावेश आहे. यावेळी माजी अध्यक्ष अमित आपटे, ज्येष्ठ सदस्य सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए डॉ. एन. के. निमकर, सीएमए अभय देवधर, सीएमए प्रमोद दुबे, सीएमए प्रसाद जोशी, सीएमए मीना वैद्य आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानत सीएमए नीलेश केकाण म्हणाले, “वाणिज्य किंवा इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे करिअरची संधी उपलब्ध करून देणे आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य पॅकेजप्रमाणे नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे. संस्थेच्या सदस्यांना नवीन ट्रेंड प्रमाणे शिक्षण देऊन विकसित करणे, हा उद्देश घेऊन वर्षभर काम करणार आहे. सदस्यांसाठी आयपी, आरव्ही, इन्व्हेंटरी ऑडिट, सोशल ऑडिट आदी विषयांवर सत्रे, कार्यशाळा घेण्यावर भर दिला जाणार आहे.”
सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली, सीएमए राहुल चिंचोळकर, सीएमए हिमांशू दवे यांनीही यावेळी निवडीबद्दल आनंद व्यक्त करत मनोगत मांडले.