पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील शेवटच्या घटकांतील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणे आणि विकसित शहर घडवण्याचा संकल्प आम्ही केला आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.
भोसरी विधानसभा मतदार संघातील कृष्णानगर येथे रायरेश्वर प्रतिष्ठाणच्या माध्यमातून श्री. रायरेश्वर मंदिरासाठी सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी कृष्णानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील स्थानिक नागरिक व भाविकांकडून याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती.
भूमिपूजन कार्यक्रमासाठी यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संभाजी खैरे, श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर प्रतिष्ठाण, श्रीमंत छत्रपती शिवाजी पार्कचे सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेविका योगीता नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे, नितीन बोऱ्हाडे, मंगेश हिंगणे, निखील बोऱ्हाडे, अतूल बोराटे, निलेश तळेकर आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रभागनिहाय प्रलंबित विकासकामे निवडणूक आचारसंहितामुळे रखडली होती. ‘‘परिवर्तन हेल्पलाईन- 93 79 90 90 90’’ च्या माध्यमातून नागरी समस्या आणि पावसाळा पूर्व कामे, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सोसायटीधारकांच्या समस्या, अशी कामे प्राधान्याने मार्गी लावली जात आहेत.