महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. प्रसाद देशपांडे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. प्रसाद देशपांडे यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी ॲड. अनुरुद्र चव्हाण, सचिवपदी ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिवपदी सीएमए नवनाथ नलावडे, खजिनदारपदी कैलास काशीद यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या ‘ज्ञानमंदिर’ सभागृहात नुकत्याच झालेल्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२४-२५ या वर्षीच्या नवी कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, बी. एम. शर्मा, सीए सुनिल भांडवलकर, प्रकाश पटवर्धन, नवनीतलाल बोरा, मनोज चितळीकर, शरद सूर्यवंशी, ॲड. मिलिंद भोंडे, ॲड. दिपक गोडसे, संतोष शर्मा, विलास अहेरकर, सीए मुजुमदार, व्ही. एन. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. माजी अध्यक्ष ॲड. महेश भागवत, आयसीएआयच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सीए सचिन बन्सल यांना कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कर सल्लागार संस्था आपल्या कार्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दोन हजाराहून अधिक मान्यवर सभासद आहेत. संस्थेकडून सर्व कर सल्लागार, सनदी लेखापाल आदींना कर रचनेतील विविध बदल याबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबत सरकारच्या विविध योजनांचा प्रसार केला जातो. संस्थेचे हे कार्य नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ॲड. प्रसाद देशपांडे यांनी नमूद केले.

कर सल्लागार संस्थेने गेल्या वर्षात ३६ कार्यक्रम राबवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी सामंजस्य करार झाला. प्राप्तिकर, जीएसटी यावर विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पार पडले. सर्व सहकाऱ्यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना सीएमए श्रीपाद बेदरकर यांनी व्यक्त केल्या. प्रणव शेठ व ॲड. अनुरुद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.