पुणे ११ जून २०२४ : टाटा प्लेच्या प्लॅटफॉर्म सर्विस पोर्टफोलिओला नवीन सेवा ‘एनीमे लोकल’ सह गती मिळाली आहे. भारतातील प्रेक्षकांना सर्वोत्तम जपानी अॅनिमेशनचे मनोरंजन देत टाटा प्लेवरील एनीमे लोकल ही जाहिरात-मुक्त सेवा हिंदी, तमिळ व मल्याळम या तीन विभिन्न भाषांमध्ये सर्व टाटा प्ले सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध आहे. सुलभ अॅक्सेससाठी ही सेवा एकाच वेळी टाटा प्ले मोबाइल प्लेवर उपलब्ध असेल, ज्यामुळे पोर्टेबल, चालता-फिरता मनोरंजनाची खात्री मिळेल.
टाटा प्लेवरील एनीमे लोकल प्रतिदिन फक्त २ रूपयांमध्ये रोमांचक अॅक्शन एपिक्सपासून हृदयस्पर्शी जुन्या काळातील कथांपर्यंत क्यूरेटेड अॅनिम कन्टेन्टच्या मोठ्या बकेटसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. या सेवेमध्ये लोकप्रिय एनीमे शोजचा समावेश असेल, जसे नरूटो, सर्जिएण्ट केरोरो, निंजाबॉय रण्टारो, नरूटो शिप्पुदेन, ब्लॅक क्लोव्हर, रोबोटन आणि इतर अनेक, जे हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये पाहता येतील.
टाटा प्लेच्या चीफ कमर्शियल अँड कन्टेन्ट ऑफिसर पल्लवी पुरी म्हणाल्या, ”टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या वाढत्या पसंती आम्ही आमच्या प्लॅटफॉर्म सर्विसेससाठी दृष्टिकोन ठेवलेल्या नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंगमागील प्रेरक आहेत. टाटा प्लेवरील एनीमे लोकल आमच्या व्यापक ऑफरिंगमधील आणखी एक रत्न ठरेल. एनीमे कन्टेन्टप्रती रूची वाढत आहे आणि आमची नवीन सेवा या वाढत्या पसंतीची पूर्तता करण्यासाठी उच्च स्तरीय कन्टेन्टचा आनंद देईल. आम्ही आमच्यासोबत सहयोगाने हे क्यूरेशन सादर करण्यासाठी आमची सहयोगी कल्व्हर मॅक्स एंटरटेन्मेंटचे आभार व्यक्त करतो.”
याबाबत मत व्यक्त करत सोनी YAY!च्या (सीएमईपीएल) व्यवसाय प्रमुख लीना लेले दत्त म्हणाल्या, ”आजच्या युगामध्ये नाविन्यता मनोरंजनाच्या उत्क्रांतीला चालना देत असताना एनीमे जागतिक सेन्सेशन ठरले आहे आणि भारतात झपाट्याने विकसित होत आहे. या वाढत्या उत्साहाची पूर्तता करण्यासाठी आम्हाला टाटा प्लेसोबत ‘एनीमे लोकल’ लाँच करण्याचा आनंद होत आहे, ज्याचा भारतातील चाहत्यांसाठी एनीमे पाहण्याच्या अनुभवामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.”
एनीमे लोकल टाटा प्लेच्या ४५ हून अधिक मनोरंजन व इन्फोटेन्मेंट मूल्यवर्धित सेवांच्या श्रेणीमध्ये सामील झाली आहे, जी सर्व वयोगटांसाठी अनुकूल आहे. टाटा प्ले व्हॅल्यू अॅडेड सर्विसेस एंटरटेन्मेंट, किड्स, लर्न, रिजिनल, डीवोशन इत्यादी सारख्या शैलींमध्ये कन्टेन्ट देत आहे, ज्यामधून निवडींबाबत तडजोड न करता प्रत्येक प्रेक्षकाचे उत्तम मनोरंजन होण्याची खात्री मिळते.