पुणे, मे, २०२४ : झोमॅटो या भारताच्या खाद्य पदार्थ ऑर्डर स्वीकारणाऱ्या आणि त्याची डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्मने अलीकडेच पुण्यातील हॉटेल श्रेयस, डेक्कन जिमखाना येथे आपला ‘डिलिव्हरी पार्टनर्स डे’ साजरा केला. ‘डिलिव्हरी पार्टनर्स डे’ साजरा करण्यामागचा कंपनीचा उद्देश आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या अमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्याचा आणि त्यांच्या कुटुंबात आनंद पसरवण्याचा आहे.
यामध्ये विविध श्रेणीत पुरस्कार दिले जातात. हा प्रत्येक पुरस्कार निष्ठावान डिलिव्हरी पार्टनर्सच्या लक्षणीय सिद्धीचा गौरव करतो.‘डिलिव्हरी पार्टनर्स डे’ सोहळ्यात सहा वेगवेगळ्या श्रेणींत, डिलिव्हरी पार्टनर्सना त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा प्रत्येक पुरस्कार झोमॅटोच्या निष्ठावान डिलिव्हरी पार्टनर्सच्या असामान्य योगदानाची दखल घेणारा होता.‘टॉप परफॉर्मर्स’ हा पुरस्कार प्रत्येक झोनमधल्या सर्वोत्तम १० डिलिव्हरी पार्टनर्सना, सर्वात जास्त संख्येत ऑर्डर्स डिलिव्हर करण्याच्या त्यांच्या लक्षणीय क्षमतेबद्दल देण्यात येतो.‘एव्हरीडे हीरोज’ पुरस्कार अशा डिलिव्हरी पार्टनर्सना देण्यात येतो, जे दैनंदिन आयुष्यातील व्यक्तिगत समस्यांचा सामना करत असताना देखील आपले कर्तव्य चोख बजावून चिकाटी आणि निष्ठेचे उदाहरण सादर करतात.‘मेड अ डिफरन्स’ पुरस्कार अशा डिलिव्हरी पार्टनर्सना प्रदान करण्यात येतो, जे ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकतात किंवा आपल्या सहकारी डिलिव्हरी पार्टनर्सना त्यांच्या अडचणीत मदत करतात आणि करुणा आणि मदत करण्याच्या वृत्तीचे उदाहरण प्रस्तुत करतात.
‘इलेक्ट्रिफाईंग पार्टनर’ श्रेणीत झोमॅटो अशा डिलिव्हरी पार्टनर्सचा गौरव करते, जे इलेक्ट्रिक वाहनावरून खूप मोठी अंतरे पार करून डिलिव्हरी देतात आणि शाश्वत प्रथांचा प्रचार करतात.‘आयर्न लेडीज’ पुरस्कार महिला डिलिव्हरी पार्टनर्सच्या निष्ठेला सलाम करतो, ज्या महिला आनंद पसरवण्यासाठी सामाजिक रूढी आणि बंधने झुगारून देतात आणि इतरांना प्रेरणा देतात.‘एजलेस अचीव्हर्स’ हा वय वर्ष ५० पेक्षा मोठ्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या सन्मानार्थ दिला जणारा पुरस्कार आहे, जे आपल्या ऊर्जेने आणि उत्साहाने वयाची बंधने जुमानत नाहीत आणि सेवा देण्याच्या आपल्या पॅशनची साक्ष देतात.
फूड ऑर्डरिंग अँड डिलिव्हरी, झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश रंजन म्हणाले, “डिलिव्हरी पार्टनर्स म्हणजे खरोखर आमच्या संस्थेचा कणा आहेत. आम्हाला आमच्या निष्ठावान डिलिव्हरी पार्टनर्सच्या हृदयस्पर्शी कथा अनेकदा ऐकायला मिळतात, जे केवळ आपले नित्य कर्तव्य चोख बजावत नाहीत, तर संकट समयी समाजाच्या मदतीसाठी देखील पुढे होतात. त्यांच्यातील ही परोपकाराची भावना आणि त्यांच्या असामान्य सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी आम्ही हे पुरस्कार त्यांना प्रदान करतो.”
या सत्कार समारंभासोबत झोमॅटोने आपल्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी १५ मे रोजी पुण्यात एक फर्स्ट रिस्पॉण्डर प्रशिक्षण कार्यक्रमाचे देखील आयोजन केले. अलीकडेच लॉन्च झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश डिलिव्हरी पार्टनर्सना व्यावसायिक आणि प्रमाणित ट्रेनिंग मॉड्यूल्समार्फत वैद्यकीय प्रथमोपचार आणि सीपीआर मधील बारकावे समजावण्याचा आहे.
आपल्या सगळ्या डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक सुरक्षित आणि समावेशक वातावरण सुनिश्चित करण्याबाबत झोमॅटो वचनबद्ध आहे. आपल्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये दयाळूपणाची संस्कृती वाढवण्याचे लक्ष्य ठेवून डिलिव्हरी पार्टनर्सची क्षमता वाढवण्यासाठी कंपनी त्यांना प्रशिक्षण आणि समर्थन कार्यक्रमांचा लाभ मिळवून देते.