पोकोतर्फे स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर सह पोको एफ ६ ५ जी स्मार्टफोन लॉन्च 

पुणे मे २०२४: जेन झी ट्रेन्ड सेटर्स च्या मिड रेंज श्रेणीतील महत्त्वपूर्ण फोन्स उपलब्ध करुन देण्याच्या आपल्या वचनबध्दतेनुसार पोको तर्फे आज त्यांची एफ सिरीज सुधारीत करत भारतातील नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या कार्यक्रमात एफ६ ५ जी फोनची भारतात सुरुवात करण्यात आली.  दि पोको एफ ६ ५जी ने भारतात प्रथमच बहुप्रतिक्षित अशा स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर आणला असून याचे डिझाईन हे जेनझी गेमर्स,फोटोग्राफी चे चाहते आणि टेकच्या चाहत्यांसाठी विशेषरुपाने करण्यात आले आहे.

पोको एफ सिरीजची बाजारपेठीय मांडणी ही स्मार्टफोन बाजारपेठेत उच्चतम अशी कार्यक्षमता परवडणार्‍या दरात उपलब्ध करुन देण्यासाठी अनोख्या पध्दतीने करण्यात आली आहे.  ही सिरीज उपलब्ध नाविन्य, सातत्याने मध्यम रेंजच्या फोन्स मध्ये बदलणार्‍या अपेक्षांनुसार करण्यात आली आहे.  आपली परंपरा अबाधित राखत पोको एफ ६ ५ जी ची निर्मिती आजवरच्या पोकोच्या  अधिक कार्यक्षमतेवर आधारीत स्मार्टफोन निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. 

पोको इंडिया चे कंट्री हेड हिमांशु टंडन    म्हणाले “ पोको एफ ६ ५ जी ची सुरुवात करतांना आंम्ही खूपच आनंदी आहोत, हे उपकरण म्हणजे स्मार्टफोन पेक्षा अधिक आहे.  हे गेम चेंजर, खिशातील क्रांती असून यांत स्नॅपड्रॅगन ८ एस जेन३ प्रोसेसर आहे.  पोको एफ ६ ५ जी मुळे आम्ही मध्यम रेंजच्या स्मार्टफोन विभागात नवीन नियम आखत आहोत, यामुळे निर्भय आणि साहसी असलेल तरुण हृदयाच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करत आहोत.   

पोको एफ ६ ५ जी मध्ये शक्तीशाली स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर असून यामध्ये अत्याधुनिक ४ एनएम प्रोसेसर तंत्रज्ञान उपलब्ध आहे.  प्रोसेसरच्या कॉन्फिगरेशन मध्ये ३.० जीएचझेड वर चालणारा १ कोर्टेक्स एक्स ४ कोअर, २.८ जीएचझेड वर चालणारे ४ कोर्टेक्स ए ७२० कोअर्स आणि २.० जीएचझेडवर चालणारे ३ कोर्टेक्स ए ५२० कोअर्स यांचा समावेश आहे.  पोको एफ ६ ५ जी मध्ये मेमरीचे सुध्दा विविध पर्याय असून ८ जीबी रॅम सह २५६ जीबी स्टोअरेज, १२ जीबी रॅम सह ५१२ जीबी स्टोअरेज उपलब्ध आहे.  अधिक प्रमाणात मेमरी असल्याने ॲप्स साठवण्यासाठी, गेम्स, फोटोज आणि व्हिडिओज साठवण्यासाठी योग्य क्षमता मिळते.  हे उपकरण महत्त्वपूर्ण अशा एलपीडीडीआर५ एक्स रॅम आणि यूएफएस ४.० स्टोअरेज तंत्रज्ञानावर आधारीत आहे.  यामुळे कार्यक्षमता आणि डेटा ट्रान्सफरची गती वाढते. 

पोको एफ ६ ५ जी मध्ये ६.६७ इंचाचा ॲमोलेड डिस्प्ले असून यांत १.५ के रिझॉल्युशन सह ६८ बिलियन हून अधिक रंगांना सपोर्ट आहे, यामुळे गेमिंग, स्ट्रीमिंग आणि रोजच्या वापरासाठी सुंदर दृष्ये दिसतात.  स्क्रीन टू बॉडी रेशिओ हा पोको एफ ६ ५ जी मध्ये ९४.२७ टक्के असून यासह १२० हर्ट्झचा  रिफ्रेश रेट, टच सॅम्पलिंग रेट हो २४० आणि गेमिंग साठी ४८० हर्ट्झ चा आहे तसेच चांगले स्क्रोलिंग, ॲनिमेशन्स आणि गेम प्ले साठी २१६० हर्ट्झचा रेट ही आहे.    ,  

पोको एफ ६ ५ जी मध्ये शक्तीशाली सोनी ओआयएस+ईआयएस कॅमेरा आणि मोठे असे एफ/१.५९ अपार्चर तसेच आयएमएक्स ८८२ सेन्सर असल्याने सुंदर फोटो येतात.   पोको एफ ६ ५ जी मध्ये एआय इमेज एक्स्पान्शन, मॅजिक इरेझर प्रो, एआय बोकेह, मॅजिक कटआऊट आणि अशा अनेक सुविधा आहेत.     उपकरणामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा असून ६० एफपीएस ला ४ के, ३० एफपीएस ला ४ के, ६० एफपीएस ला १०८० पी, ३० एफपीएस ला १०८० पी आणि ३० एफपीएस ला ७२० पी चे रेकॉर्डिंग करता येते.

पोको एफ६ ५ जी मध्ये शक्तीशाली ९० वॉट टर्बो चार्जिंग सुविधा आहे ज्यामुळे वेगाने चार्जिंग होते. त्याच बरोबर फोन बरोबर १२० वॉट चार्जर मिळतो. हे उपकरण यूएसबी टाईप सी चार्जिंगने युक्त असून ५००० एमएएच (टीवायपी) ची लि आयन पॉलिमर बॅटरी देते.  यामध्ये स्मार्ट चार्जिंग तंत्रज्ञान असल्यामुळे चार्जिंगची प्रकिया नियंत्रित होऊन बॅटरीचे लाईफ आणि कार्यक्षमता वाढते. यामुळे एकूणच बॅटरीचे जीवनमान वाढून काही काळानंतरही बॅटरी चांगल्या स्थितीत राहते.

पोको एफ ६ ५ जी फोन हा भारतीय बाजारात २९ मे २०२४ रोजी दुपारी १२ पासून टायटॅनियम आणि काळ्या अशा दोन रंगात उपलब्ध असेल. याची किंमत ही ८+२५६ जीबी साठी रु २५,९९९, १२+२५६जीबी साठी रु २७,९९९ आणि १२+५१२ जीबी साठी रु २९,९९९ मध्ये उपलब्ध असेल. ही किंमत विक्रीच्या पहिल्या दिवशी उपलब्ध असून यामध्ये रु. २००० च्या बँक ऑफर्स सह रु.२००० च्या एक्सचेंज ऑफर सह उपलब्ध आहे. त्याच बरोबर ग्राहकांना सेलच्या पहिल्या दिवशी १+१ वर्षाची वॉरंटी ही देण्यात येणार आहे.