प्रेक्षकांना पुन्हा एकदा थरारक स्टंट्सने मनोरंजन करण्यास कलर्सवरील “खतरों के खिलाडी’ चा १४ व सीजन सज्ज  

पुणे; मे २०२४:  कलर्सवरील थरारक आणि रोमांचक स्टंट्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा खतरों के खिलाडी हा लोकप्रिय शो लवकरच   इस बार होंगी डर की नई कहानियां, इन रोमानिया ब्रीदवाक्यने प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हृदयाची धडधड वाढवणारे स्टंट आणि सामोरी येतील भेडसावणारी आव्हाने. एका दिल धडक रोलर कोस्टर राईडसाठी हा रियालिटी शो सज्ज असणार आहे.

या शोच्या घोषणेबद्दल बोलताना जनरल एन्टरटेन्मेंट, व्हायकॉम १८ चे अध्यक्ष आलोक जैन म्हणाले, “खतरों के खिलाडी या आमच्या  प्रारंभिक शोची मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर अजून आहे. दर वर्षी या शोची आतुरतेने वाट पाहिली जाते. अमाप लोकप्रियता आणि यश यांच्यामुळे उत्साहाने सज्ज झालेल्या या शोच्या 14 व्या आवृत्तीत प्रथमच रोमानियाच्या नेत्रदीपक प्रांतात मनातील भीतीशी दोन हात करण्यास स्पर्धक तयार आहेत. आमची अग्रेसर राहण्याची वृत्ती आणि मूल्ये यांच्याशी मिळत्या जुळत्या ब्रॅंडशी भागीदारी करून पहिल्यांदाच हुंडईला आमचे प्रेझेंटिंग पार्टनर म्हणून सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

होस्ट रोहित शेट्टी म्हणतो, “दर वर्षी ‘खतरों के खिलाडी’चा होस्ट बनणे ही एक परंपरा बनली आहे, जी निभावताना मला खूप आनंद होतो. दर वर्षी मी स्टंटच्या नवीन पातळ्या आणि अॅक्शन याबाबत प्रयोग करत असतो. प्रत्येक सीझनमध्ये नावीन्य असते आणि आगामी सीझन पहिल्यांदाच रोमानियाच्या मोहक प्रांतात मुशाफिरी करणार आहे. या नवीन सीझनमध्ये हिंमतीची कसोटी होईल आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. ‘खतरों के खिलाडी’च्या या नव्या आवृत्तीचे सूत्रसंचालन करण्यास आणि स्पर्धकांपुढे भेडसावणारे स्टंट प्रस्तुत करण्यास मी आतुर आहे.”

या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून धाडसी वीर अभिषेक कुमार, शालीन भानोट, अदिती शर्मा, गश्मीर महाजनी, करण वीर मेहरा, शिल्पा शिंदे, सुमोना चक्रवर्ती, निमृत कौर अहलुवालिया, असीम रियाज, कृष्णा श्रोफ, केदार आशीष मेहरोत्रा आणि नियती फतनानी ह्यांचे स्टंट्स पाहायला मिळणार आहे.  . एंडेमॉल शाईन इंडिया द्वारा निर्मित, हुंडई सादर करत आहे ‘खतरों के खिलाडी १४’ स्पेशल स्टेटस इंडिका ईझी हेअर कलर आणि विक्स. लवकरच येत आहे कलर्सवर!