आनंदयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘बघा आणि थंड बसा’ ला उपविजेतेपद

पुणे: आनंदयात्री करंडक राज्यस्तरीय  एकांकिका स्पर्धेत भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगर या संघाने सादर केलेल्या ‘बघा आणि थंड बसा’ या एकांकिकेने उपविजेतेपद पटकावले आहे.लेखन, दिग्दर्शन ,नेपथ्यासह चार पारितोषिके या एकांकिकेने मिळवली.

रामकृष्ण मोरे सभागृहात नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रासह बडोदा आणि बंगळुरू मधून  ५० संघ आले होते. शास्त्रिय गायक रघुनंदन पणशीकर, लेखिका विनिता पिंपळखरे, नाट्यकर्मी संजय डोळे,वसंत भडके यांच्या हस्ते दि.२६ मे रोजी सायंकाळी पारितोषिक वितरण झाले. पुण्याने चार पारितोषिके खेचून आणल्याने सर्व कलाकारांनी जल्लोष केला.

‘बघा आणि थंड बसा ‘ ही ज्वलंत विषयावरील ही नवी कोरी  कथा साकार करताना  भारत ईंग्लिश स्कूल, शिवाजीनगरच्या मुख्याध्यापिका वर्षा क्षीरसागर आणि त्यांच्या वीस विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग घेतला.तेजश्री रांगडे,समृद्धी पैठणकर,डॉक्टर धनंजय पाटील,वरुण पुराणिक,आरती आपटे,तनया आघाव,गिरीश मुरुडकर,मधुसूदन पाटील,अभिजित दिवाकर,वैभव पाध्ये,सुधीर उत्तरकर ,प्रसाद देशपांडे या कलाकारांनी प्रभावी अभिनय केला. या एकांकिकेचे लेखन, दिग्दर्शन ,नेपथ्य गिरीश मुरुडकर यांनी केले आहे. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर भरत नाट्य मंदिरात लवकरच या एकांकिकेचा   प्रयोग आयोजित  करत आहोत असे गिरीश मुरुडकर यांनी सांगितले.