क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेडने गोदरेज माय फार्म लाँच केले, गोदरेजच्या फार्मपासून ताजे दूध थेट ग्राहकांच्या दारात

मुंबई, 30 मे 2024: क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड (CDPL), भारतातील सर्वात मोठ्या आणि वैविध्यपूर्ण कृषी व्यवसायाची उपकंपनी, गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) ने आज गोदरेजच्या फार्ममधून थेट ग्राहकांच्या दारात येणाऱ्या गोदरेज माय फार्म मिल्क प्रीमियम दूध लॉन्च करण्याची घोषणा केली. गोदरेज माय फार्म दूध हे गोदरेजच्या स्वत:च्या फार्ममधून थेट उपलब्ध होते. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते पाश्चराइज्ड आणि पॅकेज केले जात असल्याने दुधाची नैसर्गिक चव आणि पौष्टिक मूल्य अबाधित राहून ते ताजेच रहात असल्याची खात्री करते. फक्त हैद्राबादमध्ये हे दूध उपलब्ध व्हावे यासाठी  दूध काढण्यापासून ते उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे, ज्यामुळे गोदरेज माय फार्म मानवी स्पर्शविरहित दूध बनवते, यात फीडपासून ब्रीडपर्यंत एकल पॉइंट पूर्णपणे नियंत्रित पुरवठा शृंखला आहे.

 भारतीय ग्राहक आज त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक आहेत आणि स्वतःसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम निवडण्याचा प्रयत्न करतात. ‘बॉटम्स अप…इंडिया सेज चीअर्स टू मिल्क’ या शीर्षकांतर्गत दुधाच्या अहवालामध्येही हेच दिसते. प्रत्येक 2 पैकी 1 ग्राहक स्वच्छतापूर्ण सोर्सिंग, प्रक्रिया आणि पॅकेजिंगचा विचार करत आहे शिवाय दूध खरेदी करताना भेसळ नसेल याची हमी मागवतो.

 माय फार्म मिल्कच्या लाँचिंगवर भाष्य करताना, गोदरेज जर्सीचे सीईओ भूपेंद्र सुरी म्हणाले, “गोदरेजमध्ये आम्ही नेहमीच दुधाचे उत्पादन आणि वितरणाच्या  पद्धतीची पूर्णपणे काळजी घेतो. गायींवर कसा उपचार केला जातो यावर दुधाचा दर्जा अवलंबून असल्याने, आम्ही 1,400 गायींची वैयक्तिक काळजी घेतो. यात त्यांचे अन्न तसेच आरोग्याचे नियमितपणे निरीक्षण केले जाते. आमचा अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प आणि पूर्णपणे नियंत्रित पुरवठा साखळीसह, आम्हाला अस्पृश्य, पौष्टिक आणि ताजे दूध वितरीत करण्यास सक्षम करते. गाईपासून पॅकेजिंगपर्यंत संपूर्णपणे दुधाचा स्त्रोत एकच असल्याने, तिची सुरक्षितता सुनिश्चित करून, ग्राहक आता गोदरेज माय फार्मच्या दुधाचा आनंद घेऊ शकतात. जसे की स्वतःच्या घराच्या अंगणात गाय आहे आणि ताजे दूध त्यांच्या टेबलावर पोहोचले आहे.”

 यासोबतच लाँच करण्यात आलेल्या अहवालानुसार, 55 टक्के ग्राहक अस्वच्छ दूध हे ब्रँडेड दूध नसल्याचे सांगतात. याव्यतिरिक्त, 90% ग्राहक उच्च-गुणवत्तेच्या आणि सुरक्षित दुधासाठी अधिक रक्कम भरण्यास तयार असतात. या अहवालामुळे ग्राहकांमधील शुद्ध आणि सुरक्षित दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीचा पुनरुच्चार झाला आहे.

 500 एमएलसाठी 50 रुपये अशी याची किंमत आहे. गोदरेज माय फार्म सध्या 70+ आधुनिक ट्रेड स्टोअर्समध्ये आणि Zepto, मिल्कबास्केट, BB डेली आणि FTH डेली सारख्या आघाडीच्या क्विक कॉमर्स चॅनेलवर उपलब्ध आहे. वर्षअखेरीस हैदराबाद शहरातील 500+ आधुनिक ट्रेड स्टोअर्समध्ये आपली उपस्थिती निर्माण करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

 गुणवत्ता, पारदर्शकता आणि तांत्रिक कौशल्याला प्राधान्य देऊन, GAVL भारतातील आरोग्यदायी आणि अधिक दोलायमान लँडस्केप तयार करण्यात आघाडीची भूमिका बजावण्यासाठी वचनबद्ध आहे.