अनिस सुंडके ह्यांनी मागितले मतदारांचे आशीर्वाद

पुणे : गेला महिनाभर विविध पक्षांकडून पुण्यात करण्यात येत असलेल्या प्रचाराच्या थोफा आज थंडावल्या,प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिल सुंडके यांनी पुणेकरांकडून मतदान रुपी आशिर्वाद मागितले. महिनाभर प्रचार करत असताना शहराच्या विविध भागातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले,भरभरून प्रेम दिले त्याबद्दल त्यांनी पुणेकरांचे आभार मानले. यापुढेही असाच विश्वास दाखवून पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला द्यावी अशी विनंती त्यांनी केली,त्यासाठी येत्या १३ तारखेला पतंग चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या प्रमाणात एमआयएम पक्षाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुणेकरांसमोर ट्रॅफिक हा मोठा विषय आहे,तो विषय सोडवण्यासाठी रिंग रोड साठी पाठपुरावा करणे हे माझे पहिले काम राहणार आहे,गेली २० वर्षांहून अधिक आपण ऐकतोय कि रिंगरोड होणार मात्र काँग्रेस तसेच भाजपाच्या सरकारमध्ये देखील अजून रिंगरोड पूर्णत्वास आलेला नाही. पुण्यात आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर माझा भर असणार आहे असे सुंडके यांनी नमूद केले.ससून सारखाच मोठा सरकारी दवाखाना पुण्यात सुरु करावा हे माझ्या प्राधान्यक्रमात असणार आहे,असेही ते पुढे म्हणाले.
वक्फ बोर्डाच्या भूखंडाविषयी दुजोरा देताना ते म्हणाले कि या गोष्टीच्या तळापर्यंत मी जाणार आणि तो भूखंड मी पुन्हा मिळवणार आणि सदर मालमत्तेमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंसाठी मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा माझा मानस आहे.
प्रचाराच्या शेवटी अनिस सुंडके यांनी कसब्यातील शेख सल्ला दर्ग्याला भेट देऊन प्रार्थना केली तसेच विजयासाठी आशिर्वाद घेतले. येत्या १३ तारखेला पतंग चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले.